शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आजींकडून शाळेला भूदान, माळवाडीच्या शाळेला दिली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 1:03 AM

एखाद्या व्यक्तीचे शिक्षणप्रेम व दानशुरता केवढी मोठी असू शकते याची नुकतीच प्रचिती तांदळी (ता. शिरूर) येटील ग्रामस्थांना आली आहे.

रांजणगाव सांडस - एखाद्या व्यक्तीचे शिक्षणप्रेम व दानशुरता केवढी मोठी असू शकते याची नुकतीच प्रचिती तांदळी (ता. शिरूर) येटील ग्रामस्थांना आली आहे. तांदळी येथील ७५ वर्षे वयाच्या शिक्षणप्रेमी आजींनी माळवाडीच्या जि. प. शाळेसाठी स्वमालकीची जागा दान देवून आपल्या दातृत्वाचेही प्रदर्शन घडविले आहे.शिरूर तालुक्यातील माळवाडी प्राथमिक शाळेसाठी अंजनाबाई पोपटराव गदादे यांनी दिली स्वखर्चाने बक्षिसपत्र करून विनामूल्य ६ गुंठे जमीन दिली आहे. त्यांनी काल स्वत: शिरूर निबंधक (रजिस्टार) कार्यालयात येऊन स्वखर्चाने बक्षिसपत्र करून शाळेचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या ताब्यात हे दस्त ऐवज दिले. शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. मुलांना शिक्षणासाठी चांगली इमारत व शाळेसाठी प्रशस्त जागा व्हावी, या उदात्त हेतूने गदादे आजींनी दिलेल्या या योगदानाचे परिसरातून कौतुक होत आहे. शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे , त्यांचे बंधू संजय गदादे व विजय पोपट गदादे यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचा शासकीय अधिकाऱ्यांनी सत्कार केला.यावेळी तांदळीचे शाळा व्यवस्थापन समिती विठ्ठल गदादे, गणेश गदादे, संचालक श्री दत्त सोसायटी तांदळीचे दत्ता गदादे, ग्रामपंचायत सदस्य मोहन गदादे, संतोष गदादे, विठ्ठल गदादे, दत्तू नलगे, माजी उपसरपंच भाऊसाहेब बनकर, आश्रत गदादे, शरद इथापे, शिक्षक नेते संभाजी फराटे, वाकडे केंद्रप्रमुख घुमरे, तांदळी सोसायटी अध्यक्ष शंकर गदादे आदी उपस्थित होते.अधिकाºयांकडून सत्कारगदादे आजींनी शाळेला विनामूल्य ६ गुंठे जमिनीचे बक्षिसपत्र करून दिल्याबद्दल शिरूरचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी अंजनाबाई पोपटराव गदादे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तहसीलदार रणजित भोसले यांनीदेखील आजींनी शाळेसाठी दिलेल्या या योगदानाचे कौतुक केले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या