शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा फसवणूक प्रकरणात 'लान्स नायक' मुख्य सूत्रधार; मुंबईच्या भेंडी बाजारातून आणल्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 11:49 IST

भेंडी बाजारातून आणल्या नोटा

पुणे : बनावट नोटांच्या फसवणूक प्रकरणात 'लान्स नायक' हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या घटनेतील आरोपीचे हवाल्याशी संबंध असून, त्या रॅकेटचे कनेक्शन शोधण्याचे काम सुरु झाले आहे. जप्त केलेल्या नोटा या ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या असल्याचे पुढे आले. त्या नोटा मुंबईच्या भेंडी बाजारातून आणल्या होत्या.

बुधवारी विमाननगर परिसरातील संजय पार्क सोसायटीतील बंगल्यातून एकूण ८७ कोटी ५ लाख ७५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेली रक्कम ही मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री उशिरापर्यंत तिची मोजणी सुरू होती. शेख अलिम समद गुलाब खान (वय ३६, रा. जेडीसी पार्क, प्रतिकनगर, येरवडा) असे या लान्स नाईकचे नाव असून, तो संरक्षण दलातील बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप खडकी या ठिकाणी लान्स नायक या पदावर कार्यरत आहे. यात आणखी पाच जणांना अटक झाली आहे. लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. चलनामध्ये दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. त्यांच्यावर 'चिल्ड्रन बँक आॅफ इंडिया' असे नमूद आहे. नोटा ठेवलेल्या बंगल्याच्या मालकाचा शोध सुरु आहे. आरोपींकडे चौकशी करण्यात आली तेव्हा बनावट चलन मुंबईतील भेंडी बाजारातून आणले असून जप्त केलेल्या बनावट चलनाचा वापर ते फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी करणार असल्याची कबुली दिली आहे.

खोट्या नोटांच्या बंडलाला ‘खऱ्या नोटा’आरोपींनी मोठ्या चलाखीने फसवणूक करण्याची ट्रीक शोधून काढली होती. खोट्या नोटांच्या बंडलला खºया नोटा लावून त्याद्वारे फसवणूक करण्यात येणार होती. त्यांनी काही लोकांची फसवणूकही केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी स्वस्तात चलन देण्याचे आमिष दाखवणारे व्हिडीओ तयार केल्याची माहिती मिळाली आहे. हे व्हिडिओ ज्यांच्याकडे काळा पैसा आहेत किंवा हवाला करणाऱ्यांना पाठविले जाणार होते, अशी माहिती समोर आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी