घरातून ५८ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:25+5:302021-05-15T04:09:25+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग जोरी हे गरम होत असल्याने घराला लागून असलेल्या पडवीत झोपले होते. परंतु, हवा ...

Lampas stole Rs 58,000 from home | घरातून ५८ हजारांचा ऐवज लंपास

घरातून ५८ हजारांचा ऐवज लंपास

याबाबत अधिक माहिती अशी की, पांडुरंग जोरी हे गरम होत असल्याने घराला लागून असलेल्या पडवीत झोपले होते. परंतु, हवा येण्यासाठी दरवाजा उघडा ठेवला होता. रात्री पावणेदोनच्या सुमारास जोरी यांच्या पत्नीने त्यांना उठवले व घरात कशाचा तरी आवाज येत आहे, असे सांगितले. त्यावेळी जोरी यांनी पाहिले असता त्यांना दोघेजण जोरात पळताना दिसले. पडवीत लाईट बंद केलेली असल्याने त्यांचे चेहरे त्यांना दिसले नाही. त्यावेळी त्यांनी घरातील कपाटातील ड्रावर पाहिला असता चोरट्यांनी ड्राॅवरमधील ४३ हजार रुपयांची रोख रक्कम १०,६४२ रुपयांची सोन्याची अंगठी, ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पान, एक हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या साखळ्या असा एकूण ५८ हजार ६४२ रुपयांचा ऐवज व जोरी यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, आरसी बुक, लायसन, बँकेचे खाते पुस्तके, असलेले पाकीट चोरट्यांनी चोरून नेले. त्याचबरोबर चोरट्यांनी काठापूर येथील शिवदत्त पोपटराव जोरी यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले.

दरम्यान चोरट्यांनी जोरी यांच्या घरातून चोरून नेलेले पाकीट व त्यातील आधारकार्ड, पॅनकार्ड, पासबुक व इतर कागदपत्रे व सोन्या-चांदीचे दागिने असलेला डबा त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या शेताच्या जवळ सापडला आहे. दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर करत आहे.

Web Title: Lampas stole Rs 58,000 from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.