लोहगाव येथील बंद घरातील सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:10 IST2020-12-08T04:10:29+5:302020-12-08T04:10:29+5:30

यादव यांच्या घरातील कुटूंब गावी गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून घर बंद होते. याचा फायदा चोरट्याने घेत बंद घराच्या ...

Lampas with gold ornaments in a closed house at Lohgaon | लोहगाव येथील बंद घरातील सोन्याचे दागिने लंपास

लोहगाव येथील बंद घरातील सोन्याचे दागिने लंपास

यादव यांच्या घरातील कुटूंब गावी गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून घर बंद होते. याचा फायदा चोरट्याने घेत बंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील सुटकेस व बॅग मध्ये असणारे सोन्याचे दागिने चोरून नेले. यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून आरोपी फरार झाले. घटनास्थळी विमानतळ पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

यासंदर्भात माहिती देताना विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार म्हणाले," यादव हे गावी असल्याने नेमके किती तोळे सोने गेले सांगता येत नाही. ते गावावरून आल्यानंतरच नेमके किती सोने चोरीला गेले हे सांगता येईल. सध्या त्यांच्या भाडेकरूंची तक्रार घेतली असून गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.

फोटो : लोहगाव कर्मभूमी नगर येथील बंद घराचे लोक तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली.

Web Title: Lampas with gold ornaments in a closed house at Lohgaon