शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Lalit Patil escape case: तीन महिन्यांपूर्वीच ललित पाटीलने केला होता पळून जाण्याचा प्लॅन!

By नम्रता फडणीस | Updated: November 30, 2023 18:22 IST

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत....

पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ललित पाटील पळून गेला असला तरी त्यापूर्वीच तीन महिने आधीपासून ललितने पळून जाण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी ललित हा वाघ याला भेटण्यासाठी दोन ते तीन वेळा तो ससून रुग्णालयातून बाहेर गेला होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये एक गुन्हा अमली पदार्थ तस्करीचा आहे. तर, दुसरा गुन्हा न्यायालयीन कोठडी अंतर्गत ससून रुग्णालयात उपचार घेत असताना, तेथून पळून गेल्याप्रकरणी दाखल आहे. या दुसऱ्या गुन्ह्यात ललित पाटीलसह त्याचा चालक सचिन वाघ या दोघांना बुधवारी प्रथमच अटक करण्यात आली.

त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ललित पाटीलला सात दिवस आणि वाघ याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला त्यावेळी सचिन वाघ  त्याच्यासोबत होता. दोघेही परराज्यात सोबतच गेले होते. मुंबई पोलिसांनी त्यांना बंगळुरू येथून अटक केली. दरम्यान, वाघ आणि ललित पाटील दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. ललितला पळून जाण्याच्या कटात वाघने सहकार्य केले. पैसे आणि कार उपलब्ध करून दिली, त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशीसाठी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी सहायक सरकारी वकील नीलिमा यादव इथापे यांनी केली. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी त्यांची मागणी मान्य केली.

टॅग्स :Lalit Patilललित पाटीलCrime Newsगुन्हेगारीsasoon hospitalससून हॉस्पिटलPoliceपोलिस