शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखाेंचा जनसमुदाय ; पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 16:48 IST

काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखाेंचा जनसमुदाय दाखल झाला आहे.

काेरेगाव भीमा : विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय काेरेगाव भीमा येथे दाखल झाला आहे. जनसमुदायाच्या मुखात ‘जय भिम’ चा नारा होता. राज्यभरातुन आलेल्या समाजबांधवांनी सोबत मशाली आणल्या होत्या. या पेटत्या मशाली द्वारे विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. मंगळवारपासून अंदाजे  14 ते 15 लाख नागरिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दाखल झाले आहेत. पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.  काेरेगाव भीम येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरासह उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , गुजरात , हरियाना , कर्णाटकसह आंध्र प्रदेशातुन मोठ्याप्रमाणावर आंबेडकरी समाज विजयस्तंभाजवळ एकवटला होता. या नागरिकांमध्ये उत्साह भरण्याचे काम जागोजागी शाहिरी जलशाच्या माध्यमातुन केले जात होते. भारत मुक्ती मोर्चा , रिपब्लीकन सेना , आरपीआय , भारतीय बौध्द महासभा यांसह अनेक सामाजीक संघटना पक्षांच्या मंडपांमध्ये शाहिरी जलसे रंगले होते. आंबेडकरी चळवळीची आणि सामाजीक विषमतेवर सडेतोड भाष्य करणारी गीते याठिकाणी गायली जात होती. यासोबतच मराठवाडा , विदर्भातुन आलेले कलाकार रस्त्याच्या कडेला, झाडाखाली सावलीत बसुन प्रभोधनात्मक गाणी सादर करीत होते. 

नागरिकांना विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एका रांगेत सोडण्यात येत होते. उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकांना रांगेतच घेरी आली. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक हाेती. दुपारच्या उन्हातही भीमसैनिक आणि नागरिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी रांगेत उभे होते. पोलीसांनी अभिवादन स्थळावर जाण्यासाठी दोन रांगा करुन बाहेर पडण्यासाठी तीन रांगा केल्या होत्या यामुळे चेंगराचेंगरी झाली नाही.  विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी गर्दीचा उच्चांककोरेगाव भीमा येथे मंगळवार रात्रीपासुन सुरु असलेला गर्दीचा ओघ बुधवारी पहाटे पासूनच वाढायला सुरुवात झाली होती. कोरेगाव भीमापासून नगर व पुण्याकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून आली. अंदाजे 14 ते 15 लाख लोक अभिवादनासाठी याठिकाणी आले होते.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेPoliceपोलिस