शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लाेन ॲप गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार; सहसचिवांचे डीजीपी, पाेलीस आयुक्तांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 09:40 IST

कमी उत्पन्न असलेला वर्ग यामध्ये भरडला जात आहे....

पुणे : बेकायदा लाेन ॲपच्या माध्यमातून कर्ज देत, त्यावर अवाजवी कर्जवसुली केल्याप्रकरणी देशभरात माेठ्या संख्येने तक्रारी दाखल झाल्या आहेत. कमी उत्पन्न असलेला वर्ग यामध्ये भरडला जात आहे. या गुन्ह्यांचा भारताची अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर त्याचा परिणाम हाेत आहे. त्यामुळे लाेन ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि या संदर्भात नागरिकांत जनजागृती करावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव अशिष कुमार यांनी राज्यांना दिले आहेत.

सायबर गुन्हेगार लाेन ॲपच्या माध्यमातून कर्ज दिल्यानंतर अवाजवी कर्ज वसुली करतात. यासाेबतच कर्जदाराच्या माेबाइलमधील काॅन्टॅक्टस, लाेकेशन आणि फाेटाे आणि व्हिडीओज अशी वैयक्तिक माहिती चाेरतात. त्याद्वारे फाेटाे माॅर्फ करून ब्लॅकमेल आणि त्रास देण्यासाठी उपयाेग करण्यात आला आहे. कर्जवसुलीच्या तगादा लावल्यामुळे, तसेच एजंटच्या जाचास कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. या गुन्हेगारांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेसमाेर आव्हान उभा केले आहे. अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवरही त्याचा परिणाम हाेत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

नागरिकांना कर्ज देणाऱ्या या लाेन ॲपवर काेणतेही नियंत्रण नाही, तसेच ते आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. सायबर गुन्हेगार डिस्पाेजल इमेल, व्हर्च्युअल नंबर, खाते आदीच्या माध्यमातून संघटीतरीत्या हे गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

भारताच्या गृहमंत्रालयातील सहसचिव अशिष कुमार यांनी या संदर्भात सर्व राज्य, तसेच केंद्रशासित प्रदेशातील सचिव, पाेलीस महासंचालक आणि विविध शहरांतील पाेलीस आयुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि सीबीआयच्या संचालकांना पत्र पाठवून, या संदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच लाेन ॲप चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे आणि या लाेन ॲपचा वापर करू नये, यासाठी नागरिकांत जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.

लाेन ॲपद्वारे फसवणूक कशी टाळता येईल?

  • क्रेडिट स्काेरला महत्त्व देण्याऐवजी स्वत:ची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती तपासा.
  • कर्जपुरवठा करणारी संस्था शासकीय नाेंदणीकृत आहे का, याची तपासणी करा.
  • कर्जपुरवठा करणाऱ्याचा प्रत्यक्षात पत्ता, संपर्क क्रमांक नसेल, तर कर्ज घेऊ नका.
  • प्रक्रिया शुल्क आणि जीएसटी यासाठी कर्जमंजुरीपूर्वी रक्कम जमा करणे टाळा.
  • मर्यादित काळासाठी ऑफर असल्याचे सांगत तुम्हाला निर्णय घ्यायला लावतात.

 

टॅग्स :PuneपुणेHome Ministryगृह मंत्रालयCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी