शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

ladki bahin yojana : केवायसीनंतरही रक्कम नाही आली, लाडक्या बहिणींची कुठे चूक झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 09:54 IST

अनेक महिला दीड हजार रुपयांच्या प्रतीक्षेत : प्रशासकीय स्तरावर उपाययोजना दिसेना, पुणे जिल्ह्यात ई-केवायसी करताना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये मोठ्या चुका झाल्याचा अंदाज आहे.

पुणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने जिल्ह्यातील अनेक महिलांची डोकेदुखी वाढवली आहे. अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. परिणामी, नियमित हप्ते मिळणाऱ्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाला असून, प्रशासकीय स्तरावर यावर ठोस आणि दुरुस्तीची उपाययोजना नसल्याचे समोर येत आहे.

राज्यातील महिलांसाठी दीड वर्षापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे. या अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेत तांत्रिक अडथळ्यांचे ग्रहण लागले आहे. पुणे जिल्ह्यात ई-केवायसी करताना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये मोठ्या चुका झाल्याचा अंदाज आहे.

बहुतांश महिलांना अर्जातील अटी आणि शर्तींचे गांभीर्य समजले नाही. परिणामी, पात्र असतानाही चुकीची माहिती नोंदविली गेल्याने या महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

दुरुस्तीचा पर्यायच उपलब्ध नव्हता...

एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर किंवा ई-केवायसी पूर्ण झाल्यावर त्यात झालेली चूक सुधारण्यासाठी पोर्टलवर कोणताही ‘एडिट’ किंवा ‘करेक्शन’चा पर्याय देण्यात आलेला नव्हता. ही सर्वांत मोठी तांत्रिक अडचण ठरली असून, चुकीच्या माहितीमुळे एकदा अपात्र ठरलेली महिला कायमची लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

किती महिलांचा पत्ता कट? आकडेवारी गुलदस्त्यात...

योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याची प्रक्रिया थेट राज्यस्तरावरून राबवली जात आहे. मात्र, या प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील नेमक्या किती महिलांना अपात्र ठरविण्यात आले, याची कोणतीही यादी किंवा अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. यामुळे जिल्ह्यात नेमका किती महिलांचा लाभ कापला गेला, हे अद्याप अस्पष्ट आहे.

ई-केवायसीमधील ‘या’ तीन चुका नडल्या...

कुटुंबातील सरकारी नोकरी : कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नसतानाही अनेकांनी हा पर्याय निवडला.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न : २.५० लाखांच्या मर्यादेऐवजी चुकीचा उत्पन्नाचा गट निवडला गेला.

कुटुंबातील इतर लाभार्थी : एकाच कुटुंबातील इतर सदस्यांच्या माहितीबाबत संभ्रम निर्माण झाला.

कागदपत्रे अपलोड न केल्याचा फटका...

अनेक महिलांनी ई-केवायसी करताना केवळ माहिती भरली. मात्र, आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे (उदा. उत्पन्नाचा दाखला, हमीपत्र) जोडली नाहीत. असे अर्ज तपासणीत बाद ठरवले आहेत. घाईघाईत अर्धवट भरलेले अर्जही अपात्र ठरविण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahin Yojana: KYC errors block funds for many women.

Web Summary : E-KYC errors plague Ladki Bahin Yojana in Pune, blocking funds. Incorrect income details, family job status, and document uploads disqualify beneficiaries. No correction option worsens the issue.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रladki bahin yojanaलाडकी बहीण योजना