कॅन्टोन्मेंटच्या जाचक कायद्यामुळे मतदानापासून वंचित
By Admin | Updated: November 29, 2014 00:05 IST2014-11-29T00:05:33+5:302014-11-29T00:05:33+5:30
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवडणूकविषयक कायदे स्वतंत्र आणि संदिग्ध असल्याने मतदारयादीत नोंद नावे नोंद करण्याची संधीच दिली गेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.

कॅन्टोन्मेंटच्या जाचक कायद्यामुळे मतदानापासून वंचित
पुणो : कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवडणूकविषयक कायदे स्वतंत्र आणि संदिग्ध असल्याने मतदारयादीत नोंद नावे नोंद करण्याची संधीच दिली गेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. नव्या मतदारांच्या अर्जाच्या सुनावणीच्या उपस्थित राहू शकले नसलेल्या 823 अर्जदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने आजच्या सुनावणीबाबतची माहिती बोर्ड मुख्यालयाच्या फलकावर काही दिवसांपूर्वी लावली होती. नव्याने नावनोंदणी करणा:या अर्जदारांच्या अर्जावरच्या हरकतींची सुनावणी आज पहिल्या दिवशी झाली. वॉर्ड क्रमांक 1 ते 4 मधील 1,273 पैकी केवळ 45क् अर्जदार उपस्थित होते. त्यांच्यापैकी ज्यांनी योग्य पुरावे दिले असतील, त्यांचीच नावे यादीत समाविष्ट होणार असल्याचे बोर्डाच्या वरिष्ठ अधिका:यांनी स्पष्ट केले.
सुमारे 2,6क्क् नव्या मतदारांनी 21 तारखेर्पयत नोंदणीसाठी अर्ज दिले होते. या अर्जावरील सुनावणी आज बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सी. व्ही. अजय यांनी घेतली. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने 28 व 29 नोव्हेंबर रोजी हरकतींवरील सुनावणी आयोजिली असून, उद्या वॉर्ड क्रमांक 5 ते 8 मधील अर्जदारांची सुनावणी होणार आहे.
दरम्यान, 2क्-22 अर्जच गायब असल्याची तक्रार नागरिकांनी केली. बोर्डाच्या अधिका:यांनी मात्र अर्जामध्ये त्रुटी असल्याने अर्जदारांनी ते स्वत:च नेले आणि परत आणून दिले नाहीत. या अर्जाची नोंद मात्र वहय़ांमध्ये राहिली, असे स्पष्टीकरण दिले.
कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक नियम 2क्क्7च्या कलम 16 नुसार बोर्डाच्या अध्यक्षाने किंवा त्याने नेमलेल्या प्रतिनिधीने हरकतींवरील सुनावणी घ्यावी, असे म्हटले आहे. अर्जदाराने यादीत नाव समाविष्ट करण्याबाबतचे पुरावे दाखवावेत, जोर्पयत अर्जदार उपस्थित राहणार नाही तोर्पयत सुनावणी होणार नाही. जे उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्याबाबत अध्यक्ष एकतर्फी निर्णय घेऊ शकतात.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणो कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांसाठी यंत्रणोने घरोघर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा नाही. मतदारांना स्वत: नोंदणी करावी लागते. ही नावे यादीत सामील होणार की नाही, याचा पाठपुरावा स्वत:च करावा लागतो, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. (प्रतिनिधी)
त्रयस्थांना सुनावणीत थारा नाही
कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक नियम 2क्क्7च्या कलम 16 नुसार बोर्डाच्या अध्यक्षाने किंवा प्रतिनिधीने हरकतींवरील सुनावणी घ्यावी. अर्जदाराने यादीत नाव समाविष्ट करण्याबाबतचे पुरावे दाखवावेत. जोर्पयत अर्जदार उपस्थित राहणार नाही, तोर्पयत सुनावणी होणार नाही. जे उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्याबाबत अध्यक्ष एकतर्फी निर्णय घेऊ शकतात. या सुनावणीच्या वेळी अर्जदार यांच्याव्यतिरिक्त तिस:या घटकाला उपस्थितीची परवानगी नाही.
मतदार राजा की मतदाराला सजा ?
आज 1,273 अर्जदारांच्या हरकतींची सुनावणी होती. मात्र, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सी. व्ही. अजय सकाळी 1क् वाजता उपस्थित झाले. दुपारी साडेबारा वाजता बोर्ड मुख्यालय सोडून अन्य कामासाठी गेले आणि दुपारी 4 वाजता परत आले. यादरम्यान झालेली सुनावणी कायदेशीर आहे का, असा प्रश्न बोर्डाचे माजी अध्यक्ष मंजूर शेख यांनी केला आणि मतदार राजाला ही सजा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.