शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

बाणेर भागात मजुराच्या डोक्यात दगड घालून खून: एक संशयित ताब्यात

By नम्रता फडणीस | Updated: June 10, 2024 18:04 IST

अनैतिक संबंधाच्या संशयातून तर नाना याचा खून झाला नाही ना,या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू

पुणे : मजुराच्या डोक्यात दगड घालून, तोंडाला रुमाल बांधून त्याचा खून करण्यात आला. ही घटना धनकुडे वस्ती बाणेर भागात घडली. खुनामागचे कारण समजले नसून,चतु: श्रुंगी पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.  नाना विठ्ठल चादर (वय 36, रा. वाकड, मुळ. नाळवंडी रोड बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत नाना याचा भाऊ सचिन चादर (वय 34) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध खुनाचा  गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 7 ते 9 जून या कालावधीत रामदास धनकुडे यांच्या मोकळ्या जागेत धनकुडे वस्ती परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नाना मजुरी करतो. पंधरा दिवसापूर्वी नाना त्याच्या बालेवाडी येथील मित्राकडे राहण्यास आला होता. दोन दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. पत्नी त्याला फोन करत होती. मात्र फोन बंद होता. तिने सासूला फोन करून नाना याचा फोन बंद असल्याची माहिती दिली. नानाच्या आईने हा प्रकार फिर्यादी मुलगा सचिन याला सांगितले. सचिन याने त्याचा सुस येथील मित्राला नाना कोठे दिसला तर कळविण्यास सांगितले होते. त्यावेळी मित्राने सांगितले की, नाना हा नेहमी धनकुडे वस्तीवर दारु पित बसलेला असतो, तो तेथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला आहे. फिर्यादींनी धनकुडे वस्तीवर जाऊन पाहिले असता, नाना त्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नाना याचे तोंड रक्ताने माखलेले होते. त्याच्या तोंडावर रुमाल बांधलेला होता. तसेच डोक्यात कठीण वस्तूने मारल्यामुळे गंभीर जखम झालेली होती. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर नाना याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नाना याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, नाना चादर याची एका महिलेशी मैत्री होती. मात्र त्या महिलेच्या पतीला हा प्रकार आवडत नव्हता.  अनैतिक संबंधाच्या संशयातून तर नाना याचा खून झाला नाही ना,या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे.

मृताच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही,  यामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सुरू आहे-अजय कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाchatushrungi policeचतु:श्रृंगी पोलीस