शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वीजपुरवठ्यातून कुरकुंभला वगळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 14:50 IST

कुरकुंभ परिसरात प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात नवीन विद्युत पुरवठ्यात औद्योगिक क्षेत्राला देखील जोडण्याची मागणी

ठळक मुद्देनवीन विद्युत पुरवठ्यात औद्योगिक क्षेत्राला देखील जोडण्याची मागणी : ग्रामस्थांचा विरोध परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने असलेला वीजपुरवठा बाधित होणारग्रामस्थांमध्ये औद्योगिक क्षेत्राबद्दल असणारी नाराजी आणखी तीव्र होऊ शकते वीज व पाणीपुरवठ्याच्या सुविधांवर गदा आणण्याचे काम

कुरकुंभ : येथे नव्याने विद्युतपुरवठा करणारी वीजवाहिनी टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे कुरकुंभ व परिसराला मिळणारी औद्योगिक क्षेत्रातील विद्युतपुरवठा करणारी सुविधा बंद पडून भारनियमनाचे चक्र सुरू होणार असल्याने कुरकुंभ ग्रामपंचायतने यावर आक्षेप घेत नव्याने टाकण्यात येणाऱ्या विद्युतवाहिनीला विरोध केला आहे. कुरकुंभ परिसरात औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या वीज व पाणीपुरवठ्याच्या सुविधांवर गदा आणण्याचे काम होत असून, त्यामुळे येणाऱ्या काळात कुरकुंभवर परिणाम होणार असून, याचा पुनर्विचार करण्याचे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे. कुरकुंभ परिसरात गेल्या ३० वर्षांपासून औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून रासायनिक प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या समस्येला येथील ग्रामस्थ सुरुवातीच्या काळापासून तोंड देत आले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना सुविधा मिळाव्या, या हेतूने तत्कालीन आमदार सुभाष कुल यांच्या माध्यमातून कुरकुंभ व पांढरेवाडी या प्रकल्पग्रस्त गावांना वीज व पाणीपुरवठा औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून करण्याच्या हेतूने प्रयत्न झाले. त्यामुळे परिसरातील विजेचा व पाण्याचा प्रश्न सुटला होता. कुरकुंभ परिसरात औद्योगिक क्षेत्रावर आधारित अनेक उद्योग व्यवसाय उभे राहिले. मात्र, सध्या औद्योगिक क्षेत्रापासून वेगळी नवीन विद्युतपुरवठा करणारी वीजवाहिनी गावात टाकण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी या नव्या वीजवाहिनीला विरोध केला आहे. कुरकुंभ परिसरात प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात डोके वर काढत आहेत. अशा परिस्थितीत गावाला मिळणाऱ्या सुविधादेखील बंद होणार काय? असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. परिसरातील दहा किलोमीटरपर्यंत दूषित झालेले जमिनीतील पाण्याच्या स्रोताने गावातील हजारो नागरिकांना औद्योगिक क्षेत्राच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने असलेला वीजपुरवठा बाधित होणार या भीतीने कुरकुंभ येथील सर्वसामान्य व्यावसायिक चिंतित झाले आहेत. अनेक छोटे व्यवसाय या परिसरात असून, वीजपुरवठा खंडित होत नसल्याने याला उभारी मिळत असताना होणारा निर्णय हा लागू होऊ नये यासाठी मागणी केली जात आहे. ........कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येने हजारो नागरिक ग्रासले असताना या परिसरात निर्माण होणाऱ्या छोट्या व्यावसायिक वृद्धीने व औद्योगिक क्षेत्रापासून मिळणाऱ्या वीज व पाणीपुरवठ्याच्या सुविधेने थोडेफार आश्वस्त होत आहोत. अशातच वीजपुरवठा वेगळा करून कुरकुंभवर अन्याय होईल, अशा पद्धतीने वीजवाहिनी टाकू नये. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये औद्योगिक क्षेत्राबद्दल असणारी नाराजी आणखी तीव्र होऊ शकते.-राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ........सध्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या विद्युत मागणीला पर्याय म्हणून व भविष्यात कुरकुंभसाठी अतिरिक्त वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजवाहिनी टाकली जात आहे. यामधून कुठलेही भारनियमन कुरकुंभला येणार नसून औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातूनच अविरत वीजप्रवाह सुरूच राहणार आहे.- मिलिंद डोंबाळे, उपकार्यकारी अभियंता, उपविभाग दौंड............कुरकुंभ येथील सरपंच राहुल भोसले यांनी कुरकुंभ येथील वीजपुरवठा औद्योगिक क्षेत्रापासून विभक्त करू नये यासाठी लेखी निवेदन उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांना दिले आहे. औद्योगिक क्षेत्रामधून वगळण्यात आल्यावर भारनियमनाचा त्रास परिसरातील व्यावसायिकांना होणार नसल्याची खात्री करूनच नवीन विद्युतपुरवठा वाहिनी सुरु करण्यात यावी याबाबत निवेदनात मागणी करण्यात आली आहे. मात्र, असा कुठलाही प्रकार होणार नसल्याचे डोंबाळे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :KurkumbhकुरकुंभMIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण