पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगुस, येरवड्यात तीस ते पस्तीस वाहनांची तोडफोड
By विवेक भुसे | Updated: December 26, 2023 15:08 IST2023-12-26T15:08:02+5:302023-12-26T15:08:46+5:30
या टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली....

पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुडगुस, येरवड्यात तीस ते पस्तीस वाहनांची तोडफोड
पुणे : आपल्या भागात वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळ्या कोयत्याने हाणामारी करुन दहशत पसरत होते. कोयत्या गँग म्हणून त्याचा उल्लेख होऊ लागला होता. आता पुन्हा कोयता गँगचा धुडगुस सुरु झाला आहे. येरवड्यात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवली. या टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली.
येरवड्यातील लक्ष्मी नगर भागात मध्यरात्री टोळके आले. त्यांच्याकडे कोयते होते. टोळक्याने लक्ष्मी नगर भागातील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कोयते उगारले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले.
टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशत पसरविण्यासाठी हा प्रकार घडविण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.