कात्रजचा 'आनंद दरबार' बनला कोविड केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:09 IST2021-05-01T04:09:24+5:302021-05-01T04:09:24+5:30

आनंद दरबार संस्थान आणि ऑरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या ४८ तासांच्या आत 'आनंद दरबार कोविड केअर ...

Kovid became the 'Anand Darbar' of Katraj | कात्रजचा 'आनंद दरबार' बनला कोविड केंद्र

कात्रजचा 'आनंद दरबार' बनला कोविड केंद्र

आनंद दरबार संस्थान आणि ऑरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या ४८ तासांच्या आत 'आनंद दरबार कोविड केअर सेंटर' सुरू करण्यात आले. हे कोविड सेंटर सुरू होण्यासाठी पुणे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संभाजी मांगडे, पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. रवींद्रकुमार काटकर आणि ऑरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. बालाजी कल्याणे या त्रिमूर्तींनी विशेष मेहनत घेतली. या कोविड केअर सेंटरचे कोणत्याही प्रकारचे उद्घाटन, सोपस्कार अथवा गाजावाजा न करता त्यांनी थेट रुग्णांवर उपचार सुरू केले आणि एक नवा अध्याय सुरु झाला. आनंद दरबार कोविड केअर सेंटरमध्ये धनकवडी कात्रज आंबेगाव ग्रामीण भागातील गरजू लोकांवर वाजवी दरामध्ये उपचार सुरू आहेत. गरज पडल्यास अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी ऑरा हॉस्पिटलमध्ये सोय करण्यात आली आहे. आनंद दरबार कोविड सेंटर हे अल्पावधीतच कोविड रुग्णांसाठी जीवनरेखा ठरले आहे.

चौकट - सकारात्मक दृष्टिकोन आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतेही सामाजिक कार्य तडीस नेता येते, हे आनंद दरबार कोविड केअर सेंटरने दाखवून दिले. या कामी प्रशासनानेसुद्धा योग्य वेळी खूप चांगली मदत केली. - डॉ रवींद्रकुमार काटकर, अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल.

Web Title: Kovid became the 'Anand Darbar' of Katraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.