शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा हिंसाचार : कोणत्याही क्षणी मिलिंद एकबोटेंना होऊ शकते अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 18:30 IST

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळं कधीही त्यांना अटक होऊ शकते

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळं कधीही त्यांना अटक होऊ शकते.  कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी सूत्रधारांचा शोध घेऊन संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली होती. 

या दंगलीच्या मुख्य सूत्रधारांविरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असूनही सरकारने त्यांना अटक केलेली नाही. ही बाब लोकशाही व कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने घातक आहे. अटकेची मागणी घेऊन विविध 35 संघटनांनी गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करीत 18 जानेवारी रोजी या घटनेचा निषेध नोंदविला होता.  

काय आहे प्रकरण - 

पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.  दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले होते. 

कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल 

येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिका-यांनी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळेही दोन्ही समाजांमध्ये अधिक कटुता निर्माण झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. पाच जानेवारी रोजी त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलेला आहे. 

भिडेंसह एकबोटेंना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही- दीपक केसरकर

कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नसून गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. मी कुठेही क्लीन चिटबाबत बोललो नाही, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले, ते सावंतवाडी येथे बोलत होते. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार  नाही. या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे सुरू असून, पोलीस दोषींवर कारवाई करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले होतं  . 

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटेBhima-koregaonभीमा-कोरेगावSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी