Koregaon Bhima | सोशल मीडियावर अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 05:35 PM2022-12-30T17:35:47+5:302022-12-30T17:36:56+5:30

पोलिसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध...

Koregaon Bhima Jayastambha Salutation Ceremony: Action will be taken against those spreading rumours communal hatred through social media | Koregaon Bhima | सोशल मीडियावर अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

Koregaon Bhima | सोशल मीडियावर अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई

Next

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदिप कर्णिक यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून २ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. 

त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Koregaon Bhima Jayastambha Salutation Ceremony: Action will be taken against those spreading rumours communal hatred through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.