शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा परिसर : १५० जणांवर प्रतिबंधक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:53 IST

दरवर्षी एक जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून ७ ते ८ लाख समाजबांधव येत असतात.

कोरेगाव भीमा : दरवर्षी एक जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून ७ ते ८ लाख समाजबांधव येत असतात. या काळात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील १८ जणांना तडीपार करण्यात आले. एकूण १५० जणांवर कारवाई करण्यात येणार असतानाच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनुजही बऱ्याच लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच १ जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया सात ते आठ लाख समाजबांधवाच्या सुरक्षेची त्याचबरोबर नियोजनाची जबाबदारी पुणे ग्रामीण पोलीस दलावर असते. परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्याकामी स्थानिक नागरिक, पोलीस मित्र, ग्रामपंचायत, अनेक उद्योजक रहदारी नियोजन करण्यासाठी मदत करत असतात. परिसरात सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरविणे, जातीय भावना दुखावणे अशांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले. परिसरात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू राहणार आहेत. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे एक जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दररोज परिसराची समक्ष भेट देऊन माहिती घेत आहेत. नागरिकांनी व मानवंदना देण्यासाठी येणाºया समाजबांधवांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. तत्काळ ९८६०२७२१२३ व ०२१३७२८६३३३ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनीकेले आहे.कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १०७ नुसार १२२ जण. कलम ११० नुसार १०, तरकलम ५६ नुसार १८ जण तडीपार अशा एकूण दीडशे जणांवर प्रतिबंधक कार्यवाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर इतरही बहुतांश लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस