शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

पुण्यातील आंबेगावात राहत्या घरात साकारले कोल्हापूरचे 'श्री अंबाबाई मंदिर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 15:43 IST

मुख्य मंदिरात महालक्ष्मीची भव्य मूर्ती साकारली असून मंदिराचा उंच कळस पाहताना थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात आल्याची अनुभूती येते

पांडुरंग मरगजे

धनकवडी : गौरी-गणपतीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण! या भावनेतून आंबेगाव येथील गौरव चिटणीस यांनी घरच्या गौराईसाठी कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर साकारले आहे. या मंदिरासाठी त्यांनी मोठी कल्पकता दाखवत राहत्या फ्लॅटचे रुपांतर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये केले आहे. अनोख्या 'गौराई-लक्ष्मीच्या' दर्शनाला भाविक गौरव चिटणीस यांच्या घरी गर्दी करत आहेत.

गौरव चिटणीस यांनी घराचा वर्हांडा, पॅसेज व हाॅलचे रुपांतर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराचे प्रवेशद्वार, सभामंडप व मुख्य मंदिरात केले आहे. त्यासाठी त्यांनी कागद, पुठ्ठा यांसारख्या पर्यावरण पूरक वस्तू वापरताना टाकाऊ वस्तूंचा टिकाऊ स्वरुपात वापर केला. सुरवातीला मंदिराचे आकर्षक प्रवेशद्वार, सभामंडपाच्या मधोमध गणपती, डावीकडे रेणुका मातेचे ठाणे, उजव्या बाजूला गौरी तर मुख्य मंदिरात महालक्ष्मीची भव्य मूर्ती साकारली असून मंदिराचा उंच कळस पाहताना थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात आल्याची अनुभूती येते.  ''आपल्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जसे मुखदर्शन मिळते तशीच पद्धत या देखाव्यात मी वापरली आहे. घरातील टाकाऊ वस्तूंचा पर्यावरणपूरक उपयोग केल्यास घरसुद्धा मंदिर बनते. म्हणून आपण सर्वांनी वस्तूंचा पर्यावरणपूरक वापर करत पर्यावरण संवर्धन केले तर तीच खरी गौराईची भक्ती ठरेल. - गौरव चिटणीस.'' 

टॅग्स :ambegaonआंबेगावPuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीkolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर