शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बोटांच्या ठशांवरून गुन्हेगाराची माहिती कळणार; तंत्रज्ञानाने पुणे पोलीस हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:32 IST

जलद गतीने तपास करणे होणार शक्य : शहरातील ३० पोलीस स्थानकांवर होणार ‘एएमबीआयएस’ यंत्रणा कार्यान्वित

पुणे : एखाद्या गुन्ह्याचा २४ तासांच्या आत तपास करून त्या गुन्ह्याच्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात स्कॉटलंड पोलिसानंतर एकीकडे मुंबई पोलिसांचा क्रमांक लागतो. असे म्हटले जात असले तरी दुसरीकडे पुणे पोलीस प्रशासन यंत्रणेने गुन्हेगारांना पकडण्याकरिता जास्तीत जास्त ‘हायटेक’ होण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत शहरातील ३० पोलीस स्थानकांवर ‘एएमबीआयएस’ नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार असून, त्या माध्यमातून गुन्हेगारांचा ‘बायोडाटा’ त्या मशीनमध्ये जतन केला जाणार आहे. आतापर्यंत त्यात पुण्यातील २ लाख ५० हजार आरोपींच्या बोटांचे ठसे समाविष्ट करण्यात आले आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील साडेसहा लाख आरोपींच्या बोटांचे ठसे सर्व्हरमध्ये ‘सेव्ह’ करण्यात आले आहेत.

या यंत्रणेमुळे पोलीस प्रशासनाला तातडीने महत्त्वाच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणे शक्य होणार असून त्यानिमित्ताने गुन्हासिद्धता व गुन्हेगारीला शिक्षा मिळण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एमबीआयएस (आॅटोमेटेड मल्टिमोडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम) संगणकीय कार्यप्रणाली सर्व पोलीस ठाणे, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अंगुली मुद्रा केंद्र (फिंगर प्रिंट सिस्टीम) परिक्षेत्रीय कार्यालय व मध्यवर्ती कारागृहात कार्यान्वित होणार आहे. एका कंपनीच्या माध्यमातून मेसा (महाराष्ट्र इनरोलमेंट सर्व्हिस अप्लिकेशन) हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

ही संगणकीय कार्यप्रणाली सीसीटीएन प्रणालीशी संलग्न राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण साडेसहा लाख आरोपींच्या बोटांचे ठसे या सर्व्हरमध्ये जतन करण्यात आले आहे. त्यापैकी पुण्यातील २ लाख ५० हजार आरोपींच्या बोटांचे ठसे समाविष्ट करण्यात आले आहे. अटक होणाऱ्या प्रत्येक आरोपीची बायोमेट्रिक माहिती (उदा. दहा बोटांचे ठसे, तळहातांचे ठसे, डोळ्यांची बुबुळे, डिजिटल प्रतिमा) आदी स्कॅनरद्वारे घेऊन मुंबईतील मुख्य बीएसएनएल डाटा सेंटर येथे सर्व्हरवर जतन करण्यात येणार आहे.

आरोपींची बायोमेट्रिक माहिती मुख्य सर्व्हरच्या डाटाशी पडताळून आरोपीला यापूर्वी कोणकोणत्या गुन्ह्यामध्ये अटक/शिक्षा झाल्याबद्दलची माहिती कमी वेळेत उपलब्ध होणार आहे. गुन्ह्याचे घटनास्थळावर उपलब्ध असलेल्या ‘प्रिंट’ घेण्याकरिता या कार्यप्रणालीचे पोर्टेबल साहित्य पुरविण्यात येणार आहे.एमबीआयएस कार्यप्रणालीकरिता लागणारी सर्व उपकरणे पुणे शहरातील ३० पोलीस स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आली असून, लवकरच ही कार्यप्रणाली कार्यान्वित होणार असून, त्यामुळे पोलीस प्रशासनाला गुन्ह्याचा तपास करण्याकरिता सुलभता येणार आहे.मिनिटांत सर्व काही शक्यएएमबीआयएस तंत्रज्ञानाद्वारे गुन्हेगारांच्या संदर्भात इत्थंभूत माहिती मिळण्यास व त्या माहितीचे जतन करण्यास शक्य होणार आहे.पोलीस प्रशासनाने यंत्रणेत जतन केलेली माहिती प्रशासनाच्या उपयोगाकरिता २४ बाय ७ उपलब्ध राहणार आहे. याकरिता शहरातील पोलीस स्थानके त्या यंत्रणेशी संलग्न करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे एका मिनिटाच्या कालावधीत हजारो हातांचे ठसे मोजणे व पडताळण्याचे काम करणे यामुळे शक्य होणार आहे.सर्वसाधारण आरोपीबरोबरच एखाद्या मृत आरोपीच्या बोटांचे ठसे घेण्याची यंत्रणा मशीनमध्ये तयार करण्यात आली आहे. या सगळ्या प्रक्रियेची माहिती अवघ्या मिनिटभरात संगणकीय पडद्यावर दिसणार आहे.