शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

किशोर, चांदोबाला लाखो हिट्स : मागील वर्षी झाले ऑनलाईन उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:08 IST

चांदोबा, चंपक, किशोर, ठकठक या मासिकांनी चिमुरड्यांमध्ये वाचनाची आवड आणि कुतूहल निर्माण करत अनेक पिढया घडवल्या.

ठळक मुद्देसहजसोपी आणि कलात्मक मांडणी, कविता, कथा, लेखन, आकर्षक चित्रे, खिळवून ठेवणारा मजकूर

पुणे : चांदोबा, चंपक, किशोर, ठकठक या मासिकांनी चिमुरड्यांमध्ये वाचनाची आवड आणि कुतूहल निर्माण करत अनेक पिढया घडवल्या. गोष्टींमधून चिमुरड्यांना रिझवले. सध्याच्या डिजिटल युगात हे अंक वाचकांसाठी पुन्हा एकदा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध झाले आहेत. बालभारतीने मागील वर्षी किशोर मासिक ऑनलाईन उपलब्ध करुन दिले. ऑनलाईन आवृत्तीला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून हिटसने साडेचार लाखांचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे, आनंद गिड्डे यांनी वैयक्तिक संग्रहातून १९६० ते २००५ पर्यंतचे चांदोबा चे अंक पीडीएफ पध्दतीने खुले करुन दिले आहेत. सहजसोपी आणि कलात्मक मांडणी, कविता, कथा, लेखन, आकर्षक चित्रे, खिळवून ठेवणारा मजकूर यामुळे लहान मुलांना कधी एकदा ही मासिके हातात पडतील, नव्याकोऱ्या पानांचा सुगंध घेता येईल आणि मासिके वाचून फस्त करता येतील, याबाबत कमालीची आतुरता असायची. काळ बदलला, चिमुरड्यांच्या आवडी-निवडी बदलल्या, मनोरंजनाची नवी साधने उपलब्ध झाली. वाचनसंस्कृती धोक्याची घंटा वाजवत असताना, दुसरीकडे मुले आणि मासिकांमधील स्नेह मात्र दृढच राहिला. आताचा जमाना ऑनलाईनचा आहे. काळाची गरज ओळखत मागील वर्षी बालभारतीने ह्यकिशोरह्ण मासिकाचे १९७१ पासूनचे अंक ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिले आहेत. वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून वर्गणीदारांची संख्याही वाढली आहे. आता 'किशोर' चे सुमारे ८० हजार वर्गणीदार आहेत, अशी माहिती संपादक किरण केंद्रे यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली. चांदोबा सुरुवातीला तमिळ आणि तेलुगू भाषेत उपलब्ध व्हायचे. त्यानंतर मराठीसह कन्नड, हिंदी, इंग्लिश भाषांमध्येही चांदोबा वाचायला मिळू लागला. मासिकावर अक्षरश: उड्या पडायच्या. अनेक वाचकांनी चांदोबाचे जुने अंक जतन करुन ठेवले आहेत. आनंद गिड्डे या वाचकाकडे १९६०-२००५ पर्यंतचे चांदोबाचे मराठी अंक आणि १९४९-२००६ या काळातील हिंदी अंक उपलब्ध आहेत. त्यांनी सर्व वाचकांसाठी हे अंक पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन दिले आहेत. लाखो वाचकांकडून त्यांना या अंकाबाबत विचारणाही होत असल्याचे समजते.-------------किशोर मासिकांवर वाचकांनी आजतागायत भरभरुन प्रेम केले आहे. वर्षभरापूर्वी मासिक ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आले. ऑनलाईन अंकांना वाचकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. वर्गणीदारांची संख्याही गेल्या वर्षभरात ७-८ हजारांनी वाढली आहे. १९७१ पासूनचे अंक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यonlineऑनलाइन