सकारात्मक चर्चेनंतर किसान सभेचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:11 IST2021-01-25T04:11:54+5:302021-01-25T04:11:54+5:30
बैठकीत किसान सभा जिल्हाध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे, जनवादी महिला संघटना राज्य उपाध्यक्ष किरणताई मोघे, जिल्हा सचिव डाॅ. अमोल वाघमारे, ...

सकारात्मक चर्चेनंतर किसान सभेचे आंदोलन मागे
बैठकीत किसान सभा जिल्हाध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे, जनवादी महिला संघटना राज्य उपाध्यक्ष किरणताई मोघे, जिल्हा सचिव डाॅ. अमोल वाघमारे, सचिव अशोक पेकारी, डाॅ. ज्ञानेश्वर मोटे, लक्ष्मी आढारी, नंदा मोरमारे, दत्ता गिरंगे,लक्ष्मण मावळे, जिल्हा आरोग्य आधिकारी डाॅ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अशोक नांदापुरकर, तालुका आरोग्य आधिकारी डाॅ. सुरेश ढेकळे, आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक योगेश खंडारे, आदी उपस्थित होते.
या वेळी किसान सभेचे शिष्टमंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार गरोदर माता व तिचे बाळ यांच्याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेनंतर समितीच्या सूचनेनुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील असलेले प्राथमिक आरोेग्य केंद्र, भरारी पथके यांची संबंधित ठिकाणी रुग्ण कल्याण समिती व किसान सभेचे पदाधिकारी यांच्याबरोबर दर महिन्याला बैठक बोलावून अडचणींचे निरसन करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील उपकेंद्रांची स्थिती सुधारावी यासाठी त्वरित अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. आदिवासी भागातील आरोग्य केंद्राच्या ठिकाणी महिन्यातून एक दिवस स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ भेटीचे नियोजन करण्यात येणार आहे. घोडेगाव येथे सोनोग्राफी मशिन उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.