गाव तिथे किसान मोर्चा मोहीम राज्यभर राबवणार : वासुदेव काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:08+5:302021-06-09T04:13:08+5:30
राहू, तालुका दौंड येथे आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी ते बोलत होते. या वेळी बोलताना वासुदेव काळे म्हणाले की, ...

गाव तिथे किसान मोर्चा मोहीम राज्यभर राबवणार : वासुदेव काळे
राहू, तालुका दौंड येथे आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी ते बोलत होते. या वेळी बोलताना वासुदेव काळे म्हणाले की, केंद्र सरकारचे शेतकरीधार्जिणे निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे व राज्य सरकार मध्ये विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला शेतकरीहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडणे यावरती आपला भर असेल. यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करणार आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये किसान मोर्चा संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या वेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, महाराष्ट्र राज्य भाजपा शेतकरी मोर्चाची प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दौंडकरांना मिळणे हा आपल्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे. या वेळी माजी आमदार रंजना कुल, पुणे जिल्हा भाजपा महिला अध्यक्षा कांचन कुल, भाजपा तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, गणेश आखाडे, सनी सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर देलवडी ग्रामपंचायत व पारगाव येथे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने काळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
राहू येथे वासुदेव काळे यांचा सत्कार करताना माजी आमदार रंजना कुल. आमदार राहुल कुल व कांचन कुल.