शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनाची परंपरा पुढे न्यावी : चारुदत्त आफळे; पुण्यात गोविंदस्वामी आफळे जन्मशताब्दी सांगता समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:29 IST

वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्रीरामपूरचे रेवणनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले सामाजिक ऐक्य पुरस्कार प्रदानसमाजातील अनेकांना मदतीची गरज : उदय जगताप

पुणे : माध्यमातून समाजात स्फूर्ती जागवून प्रबोधन करण्यासाठी अनेक महापुरुषांचे वर्णन केले जाते. परंतु आजच्या समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना समोर आणले नाही, तर चांगले कार्य हे केवळ भूतकाळापुरतेच मर्यादित राहील. संत नामदेव, संत एकनाथ यांनी कीर्तनाच्या माध्यमातूनच पापभिरु समाज निर्माण केला. वाणीच्या जोरावरच त्यांनी समाजात बदल केले. कीर्तनाची अशी अलौकिक परंपरा तरुणांनी अधिक सक्षमपणे पुढे न्यायला हवी, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. आफळे अकादमीतर्फे राष्ट्रीय कीर्तन सम्राट गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त श्रीरामपूरचे रेवणनाथ महाराज यांच्या हस्ते सामाजिक ऐक्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदाशिव पेठ येथील नारद व्यास मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व कीर्तनकार, आनंदबुवा जोशी, वासुदेव बुरसे, शाहीर हेमंत मावळे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, राजाभाऊ कदम आणि  गोविंदस्वामी आफळे यांचे विद्यार्थी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त गावांमधील सामाजिक कार्यासाठी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड आणि कारागृह प्रशासनाचे दक्षता अधिकारी राजेंद्र जोशी यांना सामाजिक ऐक्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ह. भ. प. आनंदबुवा जोशी यांना कीर्तनसेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मिलिंद गायकवाड आणि राजेंद्र जोशी यांनी पुरस्काराची रक्कम येरवडा कारागृहातील प्रेरणापथ या उपक्रमासाठी दिली. तर उदय जगताप यांनी नक्षलग्रस्त भागातील मुलांकरिता पुरस्काराची रक्कम वापरणार असल्याचे सांगितले.उदय जगताप म्हणाले, समाजातील अनेकांना मदतीची गरज आहे. परंतु नक्षली भागातील लोकांना मदतीची प्रामुख्याने गरज आहे. समाजाने पुढाकार घ्यायला हवा. 

टॅग्स :Puneपुणेsadashiv pethसदाशिव पेठ