शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

Aryan Khan Drugs Case: किरण गोसावीच्या मॅनेजर महिलेला गोवंडीहून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 20:18 IST

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (NCB) एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या किरण गोसावी यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे

ठळक मुद्देकिरण गोसावी याने पुण्यासह पालघर, मुंबई तसेच दिल्ली, आंध्र प्रदेश येथील तरुणांची फसवणूक केली

पुणे : आर्यन खान ड्रग्ज (Aryan Khan Drugs Case) प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी (Pune Police) त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे. शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) असे तिचे नाव आहे.

गोसावी याने नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ या काळात नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांची फसवणूक केली. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात मे २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गेल्या ३ वर्षात त्याचा तपास झाला नव्हता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे किरण गोसावी हा पुन्हा प्रकाशात आल्याने या गुन्ह्यात तपास सुरु झाला. नुकतीच फरासखाना पोलिसांनी किरण गोसावी याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस काढली होती.

याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, गोसावी याने नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांना आर्थिक गंडा घातला आहे. त्याने तरुणांकडून घेतलेले पैसे शेरबानो हिच्या बँक खात्यावर आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. त्यानुसार तिला अटक करण्यात आली आहे.

पालघर, मुंबईसह दिल्लीतही फसवणूक

किरण गोसावी याने पुण्यासह पालघर, मुंबई तसेच दिल्ली, आंध्र प्रदेश येथील तरुणांची फसवणूक केली आहे. एनसीबीच्या छाप्यात किरण गोसावी दिसून आला होता. तेव्हापासून ही जुनी प्रकरणे पुन्हा प्रकाशात आली असून दिल्ली पोलीसही त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थShahrukh Khanशाहरुख खान