किरण गोसावीच्या महिला मॅनेजरला पुण्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 08:10 AM2021-10-19T08:10:33+5:302021-10-19T08:10:54+5:30

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार

Kiran Gosavi female manager arrested in Pune | किरण गोसावीच्या महिला मॅनेजरला पुण्यात अटक

किरण गोसावीच्या महिला मॅनेजरला पुण्यात अटक

Next

पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या किरण गोसावी याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस काढल्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे.

शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (२७, रा. गोवंडी, मुंबई) असे तिचे नाव आहे. गोसावी याने नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०१८ या काळात नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांची फसवणूक केली. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी, अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले.

नुकतीच फरासखाना पोलिसांनी किरण गोसावी याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस काढली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले, गोसावी याने तरुणांकडून घेतलेले पैसे शेरबानो हिच्या बँक खात्यावर आल्याचे आढळून आले. 

मुंबईसह दिल्लीतही फसवणूक
किरण गोसावी याने पुण्यासह पालघर, मुंबई तसेच दिल्ली, आंध्र प्रदेश येथील तरुणांची फसवणूक केली आहे. एनसीबीच्या छाप्यात किरण गोसावी दिसून आला होता. तेव्हापासून ही जुनी प्रकरणे पुन्हा प्रकाशात आली असून दिल्ली पोलीसही त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Kiran Gosavi female manager arrested in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app