सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलांच्या वसतिगृहाजवळ आढळला 'किंग कोब्रा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 19:59 IST2021-02-26T19:55:22+5:302021-02-26T19:59:50+5:30
किंग कोब्राचे सहा फुटी असून त्याचे वजन साधारण साडेचार किलो

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलांच्या वसतिगृहाजवळ आढळला 'किंग कोब्रा'
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी(दि. २६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलांच्या वसतिगृहाजवळच्या केबिनमध्ये 'किंग कोब्रा' आढळून आला. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेचच सुरक्षा विभागाला कळवली. यावेळी तिथे उपस्थित असलेले सुरक्षारक्षक सुनील माळी हे साप व नाग पकडण्यात तरबेज असल्याने ही बाब त्यांना कळवण्यात आली. त्यांनी पुढील वीस ते पंचवीस मिनिटात त्या 'किंग कोब्रा'ला सुखरूपपणे सुरक्षित स्थळी सोडले.
विद्यापीठात शुक्रवारी (दि.२६) मुलांच्या वसतिगृहाजवळ आढळलेल्या 'किंग कोब्रा' चे पुनर्वसन विद्यापीठाचे सुरक्षारक्षक सुनील माळी यांनी केले. माळी यांनी या किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडले.
याबद्दल माहिती देताना माळी म्हणाले, हा किंग कोब्राचे सहा फुटी असून त्याचे वजन साधारण साडेचार किलो होते. माळी यांनी आतापर्यंत २०० हून अधिक साप व नाग पकडले आहेत.
दरम्यान, माळी यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सुरक्षा विभागाचे संचालक सुरेश भोसले तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.