शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगवरून खुनाची सुपारी दिल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:34 AM

एकता भाटी खूनप्रकरण : दिल्लीतील महिलेला पोलीस कोठडी

पुणे : वडगावशेरी येथील एकता भाटी यांच्या खूनप्रकरणात दिल्लीतून अटक केलेल्या महिलेने व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगवरून खुनाची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

संध्या विनय पुरी (वय ३३, रा. डीडीए एसएफएस, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एकता यांचे पती ब्रिजेश भाटी यांनी चंदननगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. एकता भाटी यांची २१ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिवलाल ऊर्फ शिवाजी बाबुलाल राव आणि मुकेश ऊर्फ माँटी शिवलाल राव पितापुत्रांना घटनेच्या दिवशी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडे तपासात केला असता पुरी यांनी एकता भाटी यांची हत्या करण्यासाठी राव पितापुत्राला सुपारी दिली होती, असे कबूल केले.

सोमवारी पुरी यांना दिल्ली येथून अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. भाटी यांच्या हत्येसाठी किती रक्कम देण्यात आली, कोणत्या कारणासाठी हत्या करण्यास सांगण्यात आले?, कोठे कट रचला? अटक करण्यात आलेल्याव्यतिरिक्त अन्य कोण साथीदार आहेत? आदी तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी पुरी हिला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.पुरी हिने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे शिवाजी राव याला भाटी कुटुंबीयांचा फोटो पाठविला होता. तसेच, ब्रिजेश भाटी यांचा मुलगा आयान व मुलगी अहाना हे संस्कृती विद्यालय, वडगावशेरी येथे शिकत असल्याची माहिती व शाळेचे लोकेशन पुरी हिने राव याला सेंड केले होते.राव हा पुरी हिची बहीण टीना हिच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप व व्हिडीओ कॉल करीत. त्यानंतर पुरी हिच्याशी कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत, असे तपासातून समोर आले आहे. पुरी हिचे फिर्यादी यांच्यासोबत अनैतिक संबंध तसेच आर्थिक व्यवहार होते.त्या काही दिवसांपूर्वी भाटी यांच्या वडगावशेरीतील घरी येऊन गेल्या होत्या. तसेच फिर्यादी यांचे भाऊ पी्रतमोहन राजबीसिंग भाटी यांना फोन करून ब्रिजेश यांच्या खानदानाला मारून टाकण्याची धमकी दिली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी