पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार करुन खून; हडपसरमधील मिरेकर वस्तीतील घटना

By विवेक भुसे | Updated: September 18, 2023 11:52 IST2023-09-18T11:51:39+5:302023-09-18T11:52:00+5:30

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे...

Killing a youth by stabbing him out of prior enmity; Incident at Mirekar settlement in Hadapsar | पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार करुन खून; हडपसरमधील मिरेकर वस्तीतील घटना

पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार करुन खून; हडपसरमधील मिरेकर वस्तीतील घटना

पुणे : पूर्ववैमनस्यातून युवकावर कोयत्याने सपासप वार करुन त्याचा निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार हडपसरमधील मिरेकर वस्तीत घडला. स्वप्नील विठ्ठल झोंबर्डे (वय १७, रा. शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

सनी रावसाहेब कांबळै (वय २५), अमन साजिद शेख (वय २२) आकाश हनुमंत कांबळे (वय २३, सर्व रा. मिरेकर वस्ती, हडपसर) यांच्यासह तीन अल्पवयीनांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मिरेकर वस्तीत रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत विठ्ठल महादेव झोंबार्डे (वय ४६, रा. मिरेकर वस्ती, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील झोंबर्डे याचे आरोपीबरोबर पूर्वी भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी स्वप्नील याच्या डोक्यावर लोखंडी हत्यारांनी वार करुन त्याला जीवे ठार मारले. सनी कांबळे व अमन शेख यांनी हातातील शस्त्रे हवेत फिरवून आमच्यासोबत कोणी पंगा घेतला तर त्याचा असाच मुडदा पाडू, अशी धमकी देऊन दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करीत आहेत़.

Web Title: Killing a youth by stabbing him out of prior enmity; Incident at Mirekar settlement in Hadapsar