शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या मोबाईलच्या दीड हजारासाठी ब्लेडने वार करुन खून

By विवेक भुसे | Updated: May 8, 2023 16:08 IST

फुटपाथवर राहणाऱ्या दोघांमध्ये वाद झाल्याने एकाने ब्लेडने वार करून खून केला

पुणे : जुन्या मोबाईलचे दीड हजार रुपये न दिल्याच्या रागातून तरुणाने एकाच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन तसेच डोक्यात मारुन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

वारजे माळवाडी पोलिसांनी, राम श्रीमंत वाघमारे (वय २०, रा. वारजे पुलाजवळ, फुटपाथवर, वारजे) याला अटक केली आहे. अमरजीत जगन्नाथ गोयल (वय ५०, रा. वारजे पुलाजवळ, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक राहुल कदम यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे पुलाजवळील पृथक बराटे गार्डनसमोर शनिवारी रात्री ११ वाजता घडली.

अधिक माहितीनुसार, वारजे पुलाजवळील बराटे गार्डनसमोर फुटपाथ एक जण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनाचा अहवालात गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे तसेच डोक्यात मारहाण केल्याने झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यु झाल्याचे म्हटले. पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर निलेश खोजे व गणेश टाळकुटे यांच्याकडून माहिती मिळाली. अमरजीत गोयल व राम वाघमारे हे दोघेही फुटपाथवर रहात होते. गोयल याला वाघमारे याने जुना मोबाईल दिला होता. मात्र, त्याचे दीड हजार रुपये गोयल देत नव्हता. त्याच्यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यात वाघमारे याने त्याला मारहाण करुन ब्लेडने वार केले. त्यात गोयल याचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक रमेश बाबर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू