शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

६० लाखांच्या खंडणीसाठी दहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; भारती विद्यापीठ पोलिसांनी कट लावला उधळून

By विवेक भुसे | Updated: February 19, 2024 16:30 IST

मुलाची सुखरूप सुटका, मात्र आरोपी पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू

धनकवडी : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीतून अपहरण केलेल्या बारा वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका करत भारती विद्यापीठ पोलिसांनीअपहरणाचा डाव उधळून लावला असून पोलीस अपहरण करणाऱ्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून  त्याच्या सुटकेसाठी आरोपींनी तब्बल ६० लाखांची खंडणी मागितली असलेल्या तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी घटनेची गंभीर ओळखून तात्काळ दखल घेत दोन पथके अपहरण करणाऱ्यांच्या मागावर रवाना केली. आरोपींचा माग काढत असताना मुलाच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील बनला होता. त्यामुळे पुर्ण काळाजी घेऊन तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी शोध घेत होते.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाटेघर येथील जंगलांतून पुणे आणि सातारा पोलिसांच्या दोन पथकांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली असून आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू करण्यात येत आहे.

याप्रकरणी मुलाचे चुलते अमित भिलारे (४२) यांनी तक्रार दाखल केली होती. भिलारे बंधुंचा दुधाचा व्यवसाय आहे.भिलारे कुटूंब घरोघरी दुधाची डिलिव्हरी करतात. त्यांनी नुकतेच १७ गुंठे जागेचे प्लॉटींगचे काम सुरु केले होते. तर घराच्या बाजुला एका पत्रा शेडमध्ये राजेश शेलार आणि समीर शेलार यांना फॅब्रिकेशनच्या व्यवसायासाठी जागा भाड्याने दिली आहे. अमोल यांचा मुलगा विराज हा सायकाळी उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. तेव्हा नात्या तील एका मुलाने विराज हा राजेश शेलारच्या कारमध्ये बसून गेल्याचे सांगितले. कुटूंबाने राजेशला फोन लावला असता, तो बंद आढळला. दरम्यान राजेशच्या फोनवरु एका व्यक्तीचा फोन आला. त्याने राजेशचा खून केला असून तुमच्या मुलालाही मारुन टाकले जाईल. त्याचा जीव वाचवायचा असेल तर तातडीने ७० लाख रुपये घेऊन या अशी धमकी दिली. मात्र इतके पैसे नसल्याचे सांगितल्यावर समोरील व्यक्तींने शिवीगाळ करत फोन बंद केला. दरम्यान पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे पहाटे कुटूंबा ने थोड्याफार पैशाची व्यवस्था केली असल्याचे सांगितले. मात्र समोरील व्यक्तीने पुन्हा रागाने फोन ठेवला. दरम्यान पोलिसांनी मुलाचे आणि आरोपीचे लोकेशन शोधले. तेव्हा मुलगा तेथे बेशुध्दावस्थेत आढळला.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण