शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण व बलात्कार; एकजण अटकेत, दुसऱ्याचा शोध सुरू

By नितीश गोवंडे | Updated: February 17, 2024 17:06 IST

याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे...

पुणे : तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून तिला जबरदस्तीने कारमधून पळवून नेले. तिच्यासोबत लग्न करुन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेआठ ते शुक्रवारी (दि. १६) सकाळी साडेआठच्या दरम्यान खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप व दस्तुरवाडी गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

वाघोली येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून महेंद्र सीताराम वेताळ (रा. भावडी ता. हवेली) आणि अमोल जाधव (रा. लोणीकंद ता. हवेली) यांच्यावर बलात्कारासह आर्म अॅक्ट आणि अॅट्रोसीटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून महेंद्र वेताळ याला शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडून चंदननगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता गुरुवारी सकाळी खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप येथे जात होती. त्यावेळी अचानक एक चारचाकी (एमएच १२ व्हीएफ २६४८) तिच्याजवळ येऊन थांबली. आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखवला.

तिचे अपहरण करुन आरोपी महेंद्र वेताळ याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करुन लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर नाशिक रोडने दस्तुरवाडी गावच्या हद्दीतील एका डोंगरावर नेऊन पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ करुन दुसऱ्या दिवशी तुळापुर फाटा येथे आणून सोडून देऊन आरोपी पळून गेले. यानंतर तरुणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग