शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला खोडा, सत्ताधारी, प्रशासनाची अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:41 IST

सत्ताधारी, प्रशासनाची अनास्था : जागतिक स्तरावरील ओळख पुसली जाणार

विश्वास मोरे 

पिंपरी : संस्कृती आणि कला रक्षणाचे गोडवे गाणाऱ्या भाजपाला कलाविषयक उपक्रमांचा विसर पडला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविणाºया पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे, सावळ्या गोंधळामुळे खोडा घातला आहे. परिणामी, यंदाचा पिफ चित्रपट महोत्सवापासून चिंचवडकरांना मुकावे लागणार आहे.

भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आल्यापासून वारकºयांना भेटवस्तू देणे, विविध महोत्सव न राबविण्यावर भर दिला जात आहे. संस्कृती आणि कलारक्षणाचे गोडवे गाणाºया भाजपाला चित्रपट, संगीत आणि कलाविषयक उपक्रमांचा विसर पडला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण दाखवून शहराच्या लौकिकात भर टाकणारे महोत्सव, चांगले पायंडे बंद पाडले जात आहेत. राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना पाच वर्षांपूर्वी महापौर शकुंतला धराडे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम असताना पुणे आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवाचे पिंपरीत विस्तारीकरण झाले. पीफचे प्रवर्तक जब्बार पटेल यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडकर शहरात पीफची सुरुवात झाली होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलावंतांना अनुभवण्यास शहरवासीयांना मिळत होते. चिंचवड येथील बिग बझार येथील बिग सिनेमा येथे महोत्सवाचे आयोजन केले जात होते. त्यानंतर भाजपाची सत्ता महापालिकेत आल्यानंतर महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कालखंडातही गेल्या वर्षी पीफचे आयोजन केले होते. पुण्यात यंदाचा पीफ १० ते १७ जानेवारी या कालखंडात होणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी प्रतिसाद न दिल्याने यंदा शहरात महोत्सव होणार नसल्याचे महापालिकेने सांगितले.आजपर्यंत महोत्सवाचे उद्घाटन चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, मराठी अभिनेते रमेश देव, सीमा देव, बॉलीवूड स्टार नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले आहे. महोत्सवाच्या रूपाने जागतिक पातळीवरील कलावंत शहरवासीयांना अनुभवण्यास मिळत होते.अधिकाºयांचे दुर्लक्ष : पुढाकार कोणीच घेत नाहीमहापालिका प्रशासन पिफ आयोजित न करण्यामागे न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत आहे. वास्तविक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहूमहाराज महोत्सव अशा विविध महोत्सवांचे नामकरण करून महोत्सव आयोजित केले जात आहेत. महोत्सवांच्या आयोजनात महापालिकेतील अधिकाºयांचाही मोठा इंटरेस्ट असतो. पिफमधून आर्थिक लाभ होत नसल्याने या महोत्सवासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. पिफवरच अन्याय का, असा प्रश्न पिंपरी-चिंचवडमधील चित्रपटसृष्टीतील नागरिक उपस्थित करीत आहेत. महापालिकेतील अधिकाºयांच्या अनास्थेमुळे यंदाचा पिफ होणार नाही.पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे विस्तारीकरण काही वर्षांपूर्वी केले. स्वतंत्र उद्घाटन सोहळाही आयोजित केला जातो. यंदाही आम्ही पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संवाद साधला आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी आल्याने यंदाचा महोत्सव होऊ शकणार नाही. पुढील वर्षी महोत्सवाचे आयोजन करण्याचा प्रयत्न असेल.- जब्बार पटेल,प्रसिद्ध दिग्दर्शक

टॅग्स :PIFFपीफPuneपुणे