ओतूर ग्रामसभेत रस्ते अतिक्रमणांवर खडाजंगी चर्चा

By Admin | Updated: August 19, 2015 00:05 IST2015-08-19T00:05:12+5:302015-08-19T00:05:12+5:30

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सरपंच भीमाताई डोके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ग्रामसभेत अतिक्रमणे व रस्त्यांबाबत चर्चा झाली़

Khatiji discussion on encroachment of roads in the Gram Sabha | ओतूर ग्रामसभेत रस्ते अतिक्रमणांवर खडाजंगी चर्चा

ओतूर ग्रामसभेत रस्ते अतिक्रमणांवर खडाजंगी चर्चा

ओतूर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सरपंच भीमाताई डोके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ग्रामसभेत अतिक्रमणे व रस्त्यांबाबत चर्चा झाली़ या ग्रामसभेसाठी उपसरपंच बाळासाहेब घुले, दिलीप डुंबरे, अ‍ॅड़ कैलास पानसरे, माजी सरपंच कांचन पानसरे, शशिकांत थोरात, अरुण ढमाले, वर्षा हिरे, सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संभाजी तांबे, विनायक तांबे, वैभव तांबे, भानुविलास गाढवे, रामदास ढमाले, अरुण ढमाले, श्री कपर्दिकेश्वर देव धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिलशेठ तांबे, हेमंत डुंबरे, गंगाराम डुंबरे, महेंद्र गांधी, पानसरे, अ‍ॅड़ जयराम तांबे, विवेक पानसरे, संतोष तांबे, आशिष शहा, विश्वासराव डुंबरे, आत्माराम गाढवे, मीराबाई डुंबरे, सविता थोरात, गणेश तांबे, जयप्रकाश डुंबरे, जी़ एम़ डुंबरे, बबनदादा तांबे, मीराताई खंडागळे, शशिकांत थोरात, कृषी अधिकारी डी़ एम़ राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ श्याम बनकर, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार ए़ व्ही़ राठोड, तानाजी तांबे, भगवान तांबे, संकेत डुंबरे, पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायकवाड, ओतूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस़ एऩ गवारी, माजी जि़प़ सदस्य तुषार थोरात यांच्यासह सुमारे २०० ग्रामस्थ उपस्थित होते़
प्रारंभी ग्रामविकास अधिकारी एस़ एऩ गवारी यांनी मागील ग्रामसभेचा वृत्तांत वाचून दाखविला़ गेल्या ग्रामसभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी याविषयी काही ठरावांची पूर्तता करण्यात आली़ काहीची पूर्तता होणे बाकी आहे, असे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितले़ महाराष्ट्र ग्रामीण रोजगार लाभार्थीचे नावे व कृती आराखडा यावर चर्चा झाली. लाभार्थींची नावे व निवड झालेली कामे जाहीर करण्यात यावी व तसा ठरावही करण्यात आला़
ऐनवेळच्या विषयात रस्त्याला पडलेले खड्डे रस्त्यांचे डांबरीकरण, गावातील शासकीय जागेतील अतिक्रमणे, गावांच्या गटारीवर बांधलेले ओटे, गावात नवीन पाईपलाईन करण्यात आली त्याचे ठेकेदार कोण? काम योग्य केले नसल्याने त्या ठेकेदाराला सब ठेकेदाराला ग्रामसभेपुढे हजर करावे ़ त्याचे पेमेंट रोखावे, गावाला फसविणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी़ फौजदारी गुन्हा दाखल करावा, गावाचे पाणी वेळेत सोडावे, ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी समिती नेमावी़ खड्डे खडी व वाळू टाकून भरून घ्यावेत, या विषयावर विविध युवक, ग्रामस्थ यांनी मते मांडली़ (वार्ताहर)

Web Title: Khatiji discussion on encroachment of roads in the Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.