शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खानवटेकरांचा वाळूउपशाला विरोध

By admin | Updated: August 18, 2015 03:43 IST

येथील नदीपात्रात यापुढे काही झाले, तरी वाळूउपसा होऊ द्यायचा नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठरावही यापुढे दिला जाणार नाही, अशी

राजेगाव : खानवटे (ता. दौंड) येथील नदीपात्रात यापुढे काही झाले, तरी वाळूउपसा होऊ द्यायचा नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठरावही यापुढे दिला जाणार नाही, अशी भीमप्रतिज्ञा नागरिकांनी ग्रामसभेत केली. सरपंच बबनराव धायतोंडे यांच्या अध्यक्षतेखाली १५ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत उपस्थित सर्वच नागरिकांनी बहुमताने वाळूउपसा करण्यासाठी लिलावाला विरोध करण्याचा ठराव मंजूर केला.या आर्थिक वर्षामध्ये शासनाच्या आदेशानुसार वाळू लिलाव करण्याचे पत्र तहसीलदारांना दि. २३/६/२०१५ रोजी आले होते. या पत्रानुसार ग्रामसभेत वाळू लिलाव करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभेस उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती दिली. तेव्हा ग्रामसभेतील उपस्थित नागरिकांनी ओव्हरलोड वाळू वाहतुकीने खराब होणाऱ्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपाय म्हणून वाळू वाहतुकीने नादुरुस्त झालेला रस्ता हा शासनाकडून प्रथम मंजूर करून घ्यावा व तो दुरुस्त करून घ्यावा, असे सर्वानुमते ठरले. ग्रामसभेत शाहूराजे राजेभोसले यांनी उभे राहून लिलाव होऊ देऊ नये व इतर ठिकाणचा बदली भूखंड म्हणूनदेखील खानवटे गावच्या नदीपात्रातील वाळूउपसा होऊ नये, अशी सूचना मांडली. या सूचनेला ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी वाळू लिलावला विरोध केला. तसेच, २०१५-२०१६ या वर्षात कोणत्याही परिस्थितीत वाळू लिलाव होऊ देऊ नये, असे सर्वानुमते ठरले. गतवर्षी झालेल्या वाळू लिलावातील ३0 टक्के रक्कम लवकरात लवकर ग्रामपंचायत खाती वर्ग करण्यात यावेत, हा विषय मांडला. अ‍ॅड. किशोर माहूरकर यांनी याला अनुमोदन दिले. या वेळी सरपंच बबनराव धायतोंडे, उपसरपंच शंकर पवार, ग्रामसेवक डी. बी. शिंदे, दौंड तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष हनुमंत कन्हेरकर,शाहूराजे राजेभोसले, अ‍ॅड. किशोर माहूरकर, राजेंद्र झोंड, शरद ढवळे, अंकुश माहुरकर, बापू थोरात, संतोष लोंढे, रवी भोसले आदी उपस्थित होते. याबाबत सरपंच बबनराव धायतोंडे म्हणाले, की गावातील जनतेने सर्वसंमतीने घेतलेला निर्णय ग्रामपंचायतीला मान्य राहील. ३० टक्के रक्कम मिळण्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. ती रक्कम मिळाल्यानंतर त्या रकमेचा उपयोग गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे पूर्णपणे वापरला जाईल.