खामगावला अडीच लाखांंची चोरी

By Admin | Updated: April 26, 2017 03:01 IST2017-04-26T03:01:26+5:302017-04-26T03:01:26+5:30

खामगाव (ता. दौंड) येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील रोख रक्कम ६0 हजारांसह

Khagagawa theft of two lakhs | खामगावला अडीच लाखांंची चोरी

खामगावला अडीच लाखांंची चोरी

पाटेठाण : खामगाव (ता. दौंड) येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील रोख रक्कम ६0 हजारांसह साडेसात तोळ्यांचा सोन्याच्या ऐवज असा एकूण २ लाख ५0 हजारांची चोरी केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. भरदिवसा लोकवस्तीमध्ये झालेल्या या चोरीच्या घटनेने खामगाव परिसरात खळबळ उडत भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
या चोरीप्रकरणी गंगाराम पांडुरंग नागवडे (वय ४५, रा. खामगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी गंगाराम नागवडे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते, तर त्यांची पत्नी घराच्या दरवाजाला कुलूप लावून शेजारी असणाऱ्या महिलांच्या सुवासिनीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून १५ हजार रुपये चोरले. कपाटातील ४५ हजार रुपये व कपाटातील बॅगेतील साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.(वार्ताहर)

Web Title: Khagagawa theft of two lakhs