खडकवासला धरणाचा पाणीसाठा १७ टीएमसी
By Admin | Updated: August 1, 2016 07:46 IST2016-08-01T07:45:04+5:302016-08-01T07:46:54+5:30
शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे.

खडकवासला धरणाचा पाणीसाठा १७ टीएमसी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १- शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे पाणीसाठा १७ टीएमसीवर पोहचला असून आणखी काही दिवस पाऊस सुरु राहिल्यास पुणेकरांची पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.
या साखळी मधील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणाची क्षमता ३० टीएमसी आहे. दरम्यान मागील वर्ष वगळता ही चारही धरणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात भरतात.