शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

अजित पवार यांच्या मागणीबाबत पक्षातील प्रमुख लोक निर्णय घेतील- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 11:31 IST

त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यातून निर्णय होईल,असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले...

बारामती (पुणे) : पक्ष संघटनेच्या कामात सर्वांनी लक्ष घालावे अशी प्रत्येकाचीच भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावर व्यक्त केले आहे, त्यात यापेक्षा वेगळे काही नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी पक्ष संघटनेतील पदाच्या केलेल्या मागणीबाबत निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यातून निर्णय होईल,असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

बारामतीत सोमवारी (दि. २६) सकाळी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट मत व्यक्त केले. यावेळी पवार यांनी, फडणवीस यांच्या एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी व पवारांनी केली तर मुत्सुदेगिरी या वक्तव्यावर देखील परखडपणे मत व्यक्त केले. यावेळी पवार यांनी मी बेईमानी कधी केली हे त्यांनी सांगावे, असा सवाल केला. १९७७ साली आम्ही सरकार बनवले. पण त्यात भाजप माझ्यासोबत होता. त्यामुळे त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहीत नसेल. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवले ते सगळ्यांना घेऊन केले. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते, आणखी काही सदस्य होते. मला वाटते ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील त्यामुळे त्यांना त्या काळातील माहिती नसेल. त्यामुळे ते अज्ञानापोटी अशी स्टेटमेंट करतात यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज नाही,असा टोला पवार यांनी लगावला.

पाटण्यातील बैठकीत १९ पंतप्रधान एकत्र आले होते, या विरोधकांच्या टीकेवर पवार म्हणाले, हे त्यांचे पोरकटपणाचे भाष्य आहे. या बैठकीत पंतप्रधान या विषयाची चर्चा झाली नाही. महागाई, बेरोजगारी, सांप्रदायिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल बैठकीत चर्चा झाली. कोणत्याही राज्यात जाती-धर्मात मतभेद वाढले तर समाजाच्या दृष्टीने ते चांगले नाही. सत्ताधारी भाजप तशी पावले टाकत आहे. या सगळ्या गोष्टींना आवर घालण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, हा बैठकीत चर्चेचा विषय होता. पण गेली दोन-तीन दिवस अनेक तथाकथित लोक यावर टीका करत आहेत. लोकशाहीत बैठकीची परवानगी नाही का, असा प्रश्न पवार यांनी केला. केसीआरने महाराष्ट्रातील कांद्यांच्या प्रश्नात हात घातल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, संबंध राज्याचा विचार केला तर कांदा हे पीक फक्त पश्चिम महाराष्ट्रात होतो. नाशिक, धुळे व तीन चार जिल्ह्यांत जिरायत शेतकरी कांदा पिक घेतात. काही वृत्तपत्रात अशी माहिती आली आहे की, येथील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी हैद्राबादला नेला. तेथे त्यांची फजिती झाली. त्यामुळे हे थोडे राजकीयदृष्ट्या वेगळे चित्र दाखवू शकतो, एवढाच त्यांचा प्रयत्न. त्यांना सेवा करायची असेल तर त्यांचे स्वागत आहे. केसीआर करत असलेल्या शक्तीप्रदर्शनाबाबत ते म्हणाले, त्यांच्याकडे साधन, संपत्तीची चिंता नाही. त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे. आगामी काळात ते आव्हान निर्माण करतील का हे निवडणूकीतच दिसेल,असे पवार म्हणाले.

...मॅच्युअर पॉलिटीक्सची कमतरताभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बैठकीची गरज काय होती. पण मुंबईमध्ये मित्र पक्षांची बैठक भाजप घेणार असल्याची बातमी वाचण्यात आली. मग तुम्हाला बैठका घेता येतात इतरांनी घेतल्या तर त्यात चुकीचे काय. मॅच्युअर पॉलिटीक्सची कमतरता आहे, एवढेच मी याबाबत म्हणू शकेल, असे शरद पवार म्हणाले.

...त्यांचे वाचन कमी असेल.राष्ट्रवादीत ओबीसींना पुरेशी संधी मिळत नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आमच्या पक्षाचे राज्याचे पहिले अध्यक्ष छगन भुजबळ होते. नंतरच्या काळात मधुकर पिचड, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी मिळाली. त्यामुळे याबाबत विरोधकांकडून आरोप होत असतील तर त्यांचे वाचन कमी असेल. या बाबींची नोंद न घेता ते विधाने करतात. पण लोकांना सगळे माहित असते,असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.

यंदाच्या पावसाळ्यात अलनिनोचा प्रभाव राहिल का यासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणाले, गेल्या पाच सहा दिवसांपूवीर्ची स्थिती व आजची स्थिती यात फरक आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी अतिशय चिंतेचे वातावरण राज्यात होते. पाऊस नव्हता. पण गेल्या दोन दिवसात हवामानात बदल दिसतो आहे. त्याचा परिणाम कुठे ना कुठे पाऊस होताना दिसतो आहे. हवामान खात्याचा अहवाल आहे, तो या पाच दिवसांसाठी अनुकुल असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस