शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी केशव घोळवे बिनविरोध, राष्ट्रवादीच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 12:22 PM

पिंपरी चिंचवड महापालिका उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबरला तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक झाली.

पिंपरी:  उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे मोरवाडीचे प्रतिनिधीत्व करणारे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र ,घोळवे यांना फक्त पाच महिन्यांसाठी ही संधी दिली आहे. पक्षांतर्गत धुसफूस रोखण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिका उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबरला तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक झाली.  शुक्रवारी  महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत  निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सव्वा अकरा वाजता अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला होता. सभागृह नेते नामदेव ढाके, केशव घोळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ज माघार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत कदम यांनी माघार घेतली. 

........राष्ट्रवादी काँग्रेसची माघारउपमहापौरपदासाठी सोमवारी सत्ताधारी भाजपकडून केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला होता. पालिकेत भाजपचे बहुमत असल्याने त्याचवेळी त्यांची निवड निश्चित झाली होती. पण, संख्याबळ नसल्याचे आणि कोरोनाचे कारण देत नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती, विषय समिती सभापतीपदाची निवडणूक न लढविणाऱ्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. पिंपरीगावाचे प्रतिनिधीत्व करणा-या निकिता कदम यांचा अर्ज दाखल केला होता. अखेरिस त्यांनी माघार घेतली. घोळवे यांची बिनविरोध निवड झाली............उर्वरित कालखंडात दोन जणांना संधीउर्वरित कालखंडात दोन जणांना संधी द्यायची असल्याने उपमहापौर पदी केवळ पाच महिन्यांसाठी संधी दिली असून त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेतला आहे. पिंपरी पालिकेच्या उपमहापौरपदासाठी भाजपने केशव घोळवे यांना संधी दिली आहे. त्याआधी, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक व मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र भाजपातील काही कार्यकर्त्यांनी घोळवे यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. पडद्यामागील अनेक नाटय़मय घडामोडीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोळवे यांचे नाव निश्चित केल्यानंतर आमदार महेश लांडगे यांचा गट नाराज झाला. पक्षातील नाराजीचा फटका बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून घोळवे यांना पूर्ण कालावधीऐवजी पाच महिन्यांपुरतेच उपमहापौरपद देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाMayorमहापौरElectionनिवडणूक