‘कोविड-१९’ च्या बैठकीपासून ठेवले जाते दूर; बारामती नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची तक्रार     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 07:52 PM2021-03-10T19:52:45+5:302021-03-10T19:53:02+5:30

शहरात कोविड-१९ सरू झाल्यापासन आजपर्यंत एकदाही सत्ताधारी पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी अथवा विरोधी पक्ष पदाधिकाऱ्यांना बोलविले जात नाही.

Is kept away from the meeting of ‘Covid-19’; Complaint of Opposition Leader of Baramati Municipal Council | ‘कोविड-१९’ च्या बैठकीपासून ठेवले जाते दूर; बारामती नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची तक्रार     

‘कोविड-१९’ च्या बैठकीपासून ठेवले जाते दूर; बारामती नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची तक्रार     

Next

बारामती : कोविड-१९ या साथींवरील रोगाच्या बाबतीतील आयोजीत बैठकीपासुन दूर ठेवले जात असल्याची तक्रार बारामती नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी केली आहे. याबाबत सस्ते यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

शहरात कोविड-१९ सरू झाल्यापासन आजपर्यंत एकदाही सत्ताधारी पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी अथवा विरोधी पक्ष पदाधिकाऱ्यांना बोलविले जात नाही. कोणताही कोविड सेंटर उभारणे असेल अथवा कोणतीही यंत्रणा राबविणे बाबत विश्वासात घेतले जात नाही. यामध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  किरणराज यादव , तसेच तहसिलदार विजय पाटील,गटविकास अधिकारी राहुल काळभोर हे अधिकारी देखील याच पध्दतीने कामकाज करत असल्याची तक्रार सस्ते यांनी केली आहे.

त्यामुळे आमच्या प्रभागात कोरोना रुग्ण सापडून आम्हालाच याची माहिती नातेवाईकांनी सॅनिटायझर फवारणी अथवा औषधोपचारासाठी मदत मागितल्यानंतर समजते. त्यामुळे अधिकाऱ्यांना तात्काळ लेखी आदेश देवून सर्वांना सोबत घेण्याबाबत सूचना द्यावी. घरात एक पेशंट असताना उपाय योजना न केल्यामळे सर्व घर कोविड पॉझिटिव्ह होत आहे याची नोंद घ्यावी,अशी मागणी सस्ते यांनी केली आहे.

Web Title: Is kept away from the meeting of ‘Covid-19’; Complaint of Opposition Leader of Baramati Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.