केंदूरचे श्रीकांत साकोरे झाले फौजदार
By Admin | Updated: May 10, 2017 03:53 IST2017-05-10T03:53:30+5:302017-05-10T03:53:30+5:30
येथील श्रीकांत तुकाराम साकोरे हे राज्य लोकसेवा आयोगाची फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाले. दहा वर्षांपूर्वी राज्य राखीव पोलीस दलात

केंदूरचे श्रीकांत साकोरे झाले फौजदार
लोकमत न्यूज नेटवर्क
केंदूर : येथील श्रीकांत तुकाराम साकोरे हे राज्य लोकसेवा आयोगाची फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाले. दहा वर्षांपूर्वी राज्य राखीव पोलीस दलात पोलीस नाईक पदावर रूजू झालेले श्रीकांत साकोरे हे पहिल्याच प्रयत्नात फौजदारपदी पोहोचले. शेतकरी कुटुंबात राहिलेले साकोरे यांनी केंदूर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूलमध्ये कला शाखेतून बारावी पूर्ण केली. त्यानंतर थेट राज्य राखीव दलात सन २००६मध्ये पोलीस नाईकपदी नियुक्त झाले. सन २०१२ मध्ये नागरी पोलीस खात्यात अधिकारी म्हणुन रूजू व्हावे या इच्छेने त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी पूर्ण केली. मागील वर्षी त्यांनी नोकरी संभाळून खात्यांतर्गत एमपीएससीच्या विभागीय फौजदार परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. त्यांच्या या निवडीबद्दल केंदूर ग्रामस्थ व पंचायत समिती सदस्या सविता पऱ्हाड, सरपंच संगीता गावडे, उपसरपंच मनीषा थिटे यांनी
अभिनंदन केले.