शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रभक्तांना धर्माच्या चाैकटीत बसवून सामाजिक व राजकीय मतभेद निर्माण करण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 14:10 IST

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे आज परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना पहिल्या साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सबनीस बोलत होते.

पुणे : राजकीय आणि सामाजिक संस्कृती डावीकडे किंवा उजवीकडे वळते आहे, हे अन्यायकारक आहे. राष्ट्रभक्तीला जात आणि धर्माचे बंधन नसते.  पण जाती धर्माच्या चौकटीत राष्ट्रभक्तांना बसवून सतत सामाजिक आणि राजकीय मतभेद निर्माण करण्याचे काम होत असून हा अन्यायकारक प्रवाह झुगारून देण्याची गरज आहे. सामाजिक, राजकीय मतभेदांपेक्षा समाज, देश आणि राष्ट्र महत्वाचे आहे, असे मत 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

    अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे आज परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना पहिल्या साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सबनीस बोलत होते. यावेळी  प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ लेखक आणि संपादक भानू काळे,  प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे,  उपाध्यक्ष शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह नितीन गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

    अापल्या मनाेगतात सबनीस म्हणाले, परचुरे प्रकाशनाने सावरकरांची पुस्तके प्रसिद्ध करून या खर्‍या देशभक्ताला अभिवादन केले आहे. मात्र, कोणत्याही राष्ट्रीय व्यक्तीमत्वाच्या राष्ट्रभक्तीकडे संशयाने पाहणार्‍यांनी सावरकरांवर अन्याय केला हे दुर्दैवी आहे. वाचक, लेखक,  संस्कृती रक्षक यांना जोडून ठेवणारा सांस्कृतिक धागा म्हणजे प्रकाशक. दुर्दैवाने संस्कृतीच्या अजेंड्यावरून प्रकाशकाचे नाव बाजूला केले जात आहे. पण ज्ञानाची पाणपोई म्हणजे प्रकाशक होय. लेखक, वाचक आणि प्रकाशकांचा मान राखण्याचे काम समाज आणि शासन या सगळ्यांनीच केले पाहिजे.  संकटातून प्रकाशकांची सुटका होणे गरजेचे आहे.          प्रा. द.मा. मिरासदार म्हणाले की,  लेखक हा पुरस्कार मिळवण्यासाठी लिहित नाही तर व्यक्त  होण्यासाठी लिहितो. त्याला पुरस्काराची शाबासकी मिळाली तर निश्चितच प्रोत्साहन मिळते. यावेळी द. मा. मिरासदार यांनी  चित्रपट क्षेत्रातील आपल्या कार्याच्या आठवणींना खुमासदार शैलीत उजाळा दिला. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरnewsबातम्या