शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

माहितीपटातून जपला कर्तृत्वाचा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:35 IST

भारतामध्ये अजूनही कर्तृत्ववान व्यक्तींचे जीवन माहितीपटाच्या रूपाने बंदिस्त करण्याची परंपरा निर्माण झालेली नाही. समाजात बहुअंगी काम करून खूप काही देऊन जाणाऱ्या व्यक्तींचा चालताबोलता इतिहास दृश्य स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी माहितीपट हे खूपच प्रभावी माध्यम आहे.

भारतामध्ये अजूनही कर्तृत्ववान व्यक्तींचे जीवन माहितीपटाच्या रूपाने बंदिस्त करण्याची परंपरा निर्माण झालेली नाही. समाजात बहुअंगी काम करून खूप काही देऊन जाणाऱ्या व्यक्तींचा चालताबोलता इतिहास दृश्य स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी माहितीपट हे खूपच प्रभावी माध्यम आहे. माहितीपट हे संशोधनावर आधारित असल्याने ते अत्यंत खात्रीशीर व महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा बनतात, असे गरवारे महाविद्यालयाचे प्रा. प्रदीपकुमार माने यांनी सांगितले. त्यांनी बनविलेला ‘अनिल अवचट-एक मुक्तछंद’ या माहितीपटावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.प्रदीपकुमार माने म्हणाले, ‘‘मला यू-ट्यूबवर पाश्चात्त्य देशांमध्ये बनवलेले विविध विषयांवरील माहितीपट पाहण्याची आवड होती. लेखक अनिल अवचट यांचे ‘माणसं’ हे पुस्तक वाचताना मला त्यांच्यावर माहितीपट बनविला पाहिजे, असे खूप आतून वाटले. त्यांच्या ‘माणसं’ या पुस्तकानं चांगलाच भारावून गेलो. वाचक जेव्हा वाचक न राहता लेखकाचा अनुभव बनून जातो तेव्हाच खरं साहित्यदर्शन होत असतं असं म्हणतात. ‘माणसं’ पुस्तक वाचल्यानंतर माझंही असंच झालं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिक्षकाच्या मुलाचे डोळे त्यामुळे खाडकन् उघडले. समाजाकडे पाहण्याची एक दिव्य दृष्टी मिळाली. त्या पुस्तकांची परंपरा पुढे ‘धागे उभे आडवे,’ ‘धार्मिक,’ ‘प्रश्न आणि प्रश्न,’ ‘कोंडमारा’ यांसारख्या पुस्तकांनी सुरू ठेवली. अनिल अवचट यांनी रिपोर्टताजसाठी केलेला विविध प्रश्नांचा अभ्यासही स्तिमित करून गेला.अवचटांचे वैशिष्ट्य असं आहे, की ते फक्त सामाजिक प्रश्न दाखवूनच थांबत नाहीत, तर त्या प्रश्नांसाठी झटणाºया ‘कार्यरत’ आणि ‘कार्यमग्न’ व्यक्तींचाही परिचय आपल्याला करून देतात. त्यांनी सामाजिक लेखन तर केलंच, पण कविता, ललितलेखनही केलं. बालसाहित्यात त्यांनी आगळे-वेगळे प्रयोगही केले. एकेकाळी धारदार सामाजिक प्रश्नांवर लिहिणारे अवचट आता आपणासमोर लहान मुलांसाठी ‘सरल-तरल’ लिहिणारे आजोबा म्हणून दिसतात. अवचटांच्या लेखनात जी विविधता दिसते आहे, त्यापेक्षा जास्त ते ज्या कलांमध्ये रमतात त्यात आहे. ओरिगामी, काष्ठशिल्प, बासरीवादन, गायन, चित्रकला, फोटोग्राफी, स्वयंपाक असे कितीतरी छंद त्यांना आहेत. लेखन, कला या क्षेत्रांबरोबरच मुक्तांगणसारख्या संस्थेद्वारे व्यसनमुक्ती क्षेत्रात दिलेले त्यांचे योगदान संपूर्ण महाराष्टÑाला विसरता येणार नाही. अशा या मुक्तछंद पण तरीही संवेदनशील माणसाचा जीवनप्रवास ४५ मिनिटांच्या माहितीपटात मांडणं ही आमच्यासाठी आव्हानात्मक गोष्ट होती.माहितीपटाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही अवचटांच्या जवळ-जवळ दहा तासांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यांच्या जीवनावर भाष्य करणाºया विविध व्यक्तींच्या साधारणत: एकेक तासाच्या मुलाखती घेतल्या आणि मग हमाल, वेश्या, भंगी, मासेमार, जुना बाजार, मंडई, हेल्पर्स आॅफ द हॅन्डीकॅप्ड संस्था अशा कितीतरी ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चित्रण केले. हेही चित्रण दहा-बारा तासांचे झाले. म्हणजे तीसपेक्षा जास्त तासांच्या फुटेजच्या आधारे हा माहितीपट बनविला आहे. इतक्या फुटेजमधून अवचटांचे जीवन ४५ मिनिटांत मांडणं हे आमच्यापुढं आव्हान होतं, पण त्यातच तर खरी सृजनशीलता असते. हे सगळं करत असताना आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव आले, खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्या सहवासातला अनुभव हा अनुभव खूपच समृद्ध करणारा आहे.‘माणसाचं शिकणं संपलं, की त्याने स्वत:चा फोटो घरात लावून त्याला दररोज हार घालावा. शिकणं संपलं म्हणजे माणूस जिवंत असून मेल्यासारखाच ना’ अनिल अवचटांवरील माहितीपटाचे शूटिंग करताना ते एकदा असंच नकळतपणे बोलून गेले.समोर येणाºया प्रत्येक क्षणाला भरभरून प्रतिसाद देत जगणं म्हणजे काय असतं, याचं अनिल अवचट उत्तम उदाहरण आहेत. स्वत: मुक्तपणे जगण्याचा आनंद घेत असतानाही त्या आनंदातून स्वत:बरोबर आसपासच्या जगातही बदल करीत राहणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्यांची समाज, निसर्गाविषयी संवेदनशीलता सतत जाणवत राहते. यापुढील काळातही सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आदी वेगवेगळ््या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाºया व्यक्तींच्या कार्यावर माहितीपट बनविण्याचा विचार आहे.