शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीचे दोन टीएमसी पाणी पिण्यासाठी ठेवा : सुप्रिया सुळेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 20:03 IST

 खडकवासला-निरा खोऱ्यातील प्रश्नांवर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

ठळक मुद्देकऱ्हा, गुंजवणी नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती करानागरिकांचे व शेतीचे पाण्याअभावी नुकसान होण्याची शक्यता

पुणे : मुळशी तालुक्यातील नागरिकांना मुळशी धरणातील २ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन द्यावे, मुठा उजवा कालव्याची गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करावे, गुंजवणी धरणग्रस्तांना घरांसाठी दिलेल्या जागा त्यांच्या नावावर करुन द्याव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक खलिल अन्सारी यांच्याकडे केली. बारामती लोकसभा मतदार संघातील जनाई शिरसाई, पुरंदर उपसा, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, मुळशी व टेमघर या धरण क्षेत्रातील विविध पाणी योजनांबाबत प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सुळे यांनी कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांची सिंचनभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय चोपडे, अधिक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, शिवाजीराव डुबल, राष्ट्रवादीचे माणिकराव झेंडे, रणजीत शिवतारे, सचिन दोडके, नाना भूरूक, आप्पासाहेब पवार उपस्थित होते. टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात येत आहे. मात्र, या पाण्यावर अवलंबून असलेल्या काही गावांतील नागरिकांचे व शेतीचे पाण्याअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी धरण रिकामे करताना प्रथम त्यांच्यासाठी पाण्याची सोय होणे आवश्यक आहे. मुळशी भागातील स्थानिक शेतकऱ्यांना पिण्यासाठी मुळशी धरणाचे दोन टीएमसी पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सुळे यांनी केली. खडकवासला जुन्या कालव्याच्या लाभ क्षेत्रापर्यंत नवीन मुठा उजवा कालवा वाढवावा, पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सणसर कालव्यातून सोडण्यात यावे. याशिवाय जनाई शिरसाई योजनेतून सध्या काही गावांना व तेथील शेतीला पाणी दिले जाते. त्यात आणखी काही गावे वाढवावीत, असे सुप्रिया सुळे यांनी सुचविले. जनाई शिरसाई कालव्याची गळती रोखण्यासाठी अस्तरीकरण करावे. अस्तरीकरण झाल्यास वाचणारे पाणी अनेक वंचित गावांना पुरवता येईल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. --कऱ्हा, गुंजवणी नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती करा कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांच्या बाजूचे भराव अनेक ठिकाणी वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी पडझड झाली आहे. येथे तातडीने दुरुस्ती करावी. तसेच, गुंजवणी नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. -----------

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीSupriya Suleसुप्रिया सुळे