शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

किमान महापालिकेच्या बोधचिन्हाची तरी आठवण ठेवा.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 13:03 IST

आग्र्याहून हून सुटका करून घेऊन शिवाजी महाराज राजगडावर परतले तो दिवस राजगड स्मारक मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे साजरा करण्यात येत असतो.

ठळक मुद्देआग्र्याहून सुटका स्मृतीदिन: निधी देण्याची विरोधकांची मागणीमहापौर मुक्ता टिळक यांना निधी त्वरीत सुरू करावी अशी मागणी करणारे पत्र महाराजांच्या जीवनातील या प्रसंगाची प्रेरणा रहावी हा उद्देश

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुनर्जन्मच असणाऱ्या आग्र्याहून सुटका स्मृतीदिनाला (दि. १६ डिसेंबर) निधी नाकारणाऱ्या प्रशासनाने किमान महापालिकेच्या बोधचिन्हाची तरी आठवण ठेवावी असे खेदजनक उद्गार हा दिवस गेली ४० वर्ष सलगपणे साजरा करणाऱ्या राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक वसंतराव प्रसादे यांनी काढले. महापालिकेतील विरोधकांनीही हा निधी त्वरीत सुरू करावी अशी मागणी करणारे पत्र मंगळवारी महापौर मुक्ता टिळक यांना दिले.आग्र्याहून हून सुटका करून घेऊन शिवाजी महाराज राजगडावर परतले तो दिवस राजगड स्मारक मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे साजरा करण्यात येत असतो. महाराजांच्या जीवनातील या प्रसंगाची प्रेरणा रहावी हा उद्देश त्यामागे आहे. त्यासाठी महापालिकेने अगदी सुरूवातीला ३० हजार रूपये निधी दिला होता. तो गेल्या दोन वर्षांपर्यंत वाढून २ लाख रूपये झाला. त्यानंतर मात्र आता उच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा आधार घेत महापालिकेने हा निधी देणे नाकारले आहे. मागील वर्षी व याहीवर्षी हा निधी मंडळाला मिळालेला नाही. यासंबधीचे वृत्त ‘लोकमत’ ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केला आहे. त्यावर बोलताना प्रसादे म्हणाले, ‘‘कोणते न्यायालय महाराजांच्या जीवनातील या अत्युच्च पराक्रमाचे स्मरण करण्यासाठीचा निधी नाकारेल. मात्र आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. आम्ही काही कोट्यवधी रूपये मागत नाही. मंडळाकडे स्वत:चा असा काहीही निधी नाही. वर्गणी काढून उत्सव साजरा करण्यात येतो. त्यालाही आता मर्यादा येत आहेत, म्हणून महापालिकेची मदत हवी आहे. निधी नाकारणाºयांनी पालिकेच्या बोधचिन्हात असलेल्या अश्वारूढ महाराजांचे तरी स्मरण करायला हवे होते. निधी नाही म्हणून आम्ही उत्सव थांबवला नाही, तो होतच आहे व होतच राहणार, मात्र त्यात महापालिकेचा काहीही सहभाग नाही ही खंत वाटणारी गोष्ट आहे.’’महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे, शिवसेनेचे संजय भोसले, बाळा ओसवाल आदींनीही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. मोरे, शिंदे यांनी महापौरांना लेखी पत्र देत या निधीबाबत त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावा, यातून महापालिकेबाबत शिवप्रेमींमध्ये नाराजी निर्माण होत आहे अशी भावना व्यक्त केली.  .................निधी न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पदाधिकाऱ्यांचा त्यात काहीच सहभाग नाही. प्रशासनाबरोबर चर्चा करून, तसेच विधी अधिकाºयांचा सल्ला घेऊन याबाबत नक्की निर्णय घेण्यात येईल. निधी नाकारणे अयोग्य आहे असेच आमचेही मत आहे.मुक्ता टिळक, महापौर,-------------------सत्ताधारी, विरोधक असे यात काहीही नाही. न्यायालयाच्या एका आदेशाचा अर्थ लावून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीने यातून काय मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्न करू. निधीअभावी उत्सव थांबणार नाही याची काळजी घेऊश्रीनाथ भिमाले, सभागृह नेते,

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMukta Tilakमुक्ता टिळकBJPभाजपा