शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी सप्ताह विशेष : पुण्याजवळील 'कवडीपाट' पक्षी निरीक्षण केंद्राची कचऱ्यामुळे लागलीय ‘वाट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 17:58 IST

सुमारे २०० हून अधिक विविध प्रजातींचे दर्शन

ठळक मुद्देसर्वांनी स्वच्छतेसाठी करावे प्रयत्नशासन, लोकसहभाग, पयार्वरणस्नेही यांच्या सोबतीने जलपरिसंस्थांचे संवर्धन करावे लागणार

पुणे : पक्षी निरीक्षण करण्यासाठी अतिशय चांगले ठिकाण म्हणून 'कवडीपाट'ची ओळख आहे. पण गेल्या काही वर्षांपासून पावसानंतर येथे पुण्यातील कचरा वाहून येतो आणि येथील पुलाला अडकून ढीगच्या ढीग साठला जात आहे. त्याचा परिणाम हे ठिकाण घाण होत असून, पक्ष्यांनाही खाद्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे.

पुणे शहराच्या अतिशय जवळ हे ठिकाण आहे. त्यामुळे दररोज खूप फोटोग्राफर येथे पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी येतात. या ठिकाणी स्थानिक आणि स्थलांतर अशी सुमारे २०० पेक्षा अधिक पक्षी येतात. कवडीपाटची सध्याची अवस्था खूप बिकट आहे. १५ वर्षांपूवर्प खूप चांगली स्थिती होती. पण आता नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. ग्रामस्थांच्या मते प्रदूषित पाण्यामुळे शेतीच्या पीकपध्दतीवरही परिणाम होत आहे. एक समृध्द पक्षीअधिवास असलेल्या इथल्या जलपरिसंस्थांचे संवर्धन करणं महत्त्वाचे आहे. शासन, लोकसहभाग, पयार्वरणस्नेही यांच्या सोबतीने हे साध्य करावे लागणार आहे, अशी अपेक्षा पक्षी अभ्यासक विशाल तोरडे यांनी व्यक्त केली.

कवडीपाटला आढळणारे पक्षी :

नदीसुरय, ब्राह्मणी बदक उर्फ चक्रवाक, थापट्या, टिबुकली, सर्जा, पांढरा शराटी, चक्रांग, डोंबारी, स्पूनबिल (चमच्या), पाणकावळे, गाणारा थोरला धोबी, वारकरी (काॉमन कुट), धनवर (स्पॅाट बिल डक), कवड्या खंड्या (पाईंड किंगफिशर), तुतारी (सँडपायपर), शेकाटे असे विविध पक्षी या ठिकाणी पहायला मिळतात.

स्वच्छतेसाठी प्रयत्न हवेत...सध्या काही संस्थांचे ग्रुप त्या ठिकाणी येऊन स्वच्छता करतात. पण जर पुण्यातून नदीमार्गे येणारा कचरा थांबविला तरच या ठिकाणी कचराकुंडीचे स्वरूप येणार नाही. त्यासाठी नदीत कचरा टाकणे बंद करायला हवे. कवडी पाटी महापालिकेच्या हद्दीत येत नाही. त्यामुळे तिथे पालिकेकडून काहीच उपाय होत नाहीत. जर या ठिकाणी स्वच्छता ठेवली, तर हे अतिशय सुंदर असे पक्षी निरीक्षण केंद्र ठरेल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.  

टॅग्स :Puneपुणेbirds sanctuaryपक्षी अभयारण्यenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण