कात्रजचे प्रवासी उन्हातच
By Admin | Updated: October 30, 2015 00:26 IST2015-10-30T00:26:13+5:302015-10-30T00:26:13+5:30
कात्रज चौकामध्ये एसटीचा थांबा असूनही तेथे शेड नसल्यामुळे प्रवाशांना गेली कित्येक वर्षे उन्हातच उभे राहावे लागते. गेली अनेक वर्षे होऊन गेली

कात्रजचे प्रवासी उन्हातच
धनकव़डी : कात्रज चौकामध्ये एसटीचा थांबा असूनही तेथे शेड नसल्यामुळे प्रवाशांना गेली कित्येक वर्षे उन्हातच उभे राहावे लागते.
गेली अनेक वर्षे होऊन गेली, तरी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या थांब्यावर प्रवाशांची गर्दी असतानादेखील येथील प्रवाशांना निवारा काही केल्या मिळेना.
कात्रज चौकातील जकात नाक्यासमोर प्रवासी वाहनाबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या बसदेखील थांबत असल्याने प्रवाशांची व गाड्यांची खूप गर्दी होऊ लागली. त्यामुळे कात्रज चौकाच्या मागे प्रवासी थांबा तयार करण्यात आला. यामुळे विनाथांब्यासह बहुतेक सर्वच बस थांबू लागल्या व प्रवाशांचे स्वारगेटपर्यंत जाण्याचे कष्ट व वेळेत व आर्थिकदेखील फायदा झाला; मात्र या बसथांब्यावर सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवासी महापालिका, परिवहन महामंडळ तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीवर व प्रशासनवर नाराज आहेत.
शहरातील बसथांबा अनेक ठिकाणी गरज नसतानादेखील लावण्यासाठी अगदी स्पर्धा लागलेली असते; मात्र शहराच्या सातारा, मुंबई, नाशिक, सोलापूर या चारही बाजूला जाणाऱ्या मुख्य मार्गावर बसथांबे
नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.(वार्ताहर)