शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ होणार; उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक असल्याचा प्रशासनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:45 IST

सध्या प्राणिसंग्रहालयाचा वार्षिक खर्च महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असून पुढील काळात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे

पुणे: महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कामध्ये (तिकीट दर) ५० टक्के वाढ होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव उद्यान विभागाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. प्राणिसंग्रहालयातील उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

कात्रज येथे असलेले हे संग्रहालय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय आहे. त्यामुळे राज्यासह पुणे शहरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात या संग्रहालयास भेट देतात. महापालिकेकडून प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. या विस्तारीकरणानंतर झेब्रा, पिसोरी हरीण, लायन टेल्ड मकाक या नव्या प्रजातींसाठी प्रदर्शने उभारली जात असून मॉर्मोसेट, टॅमरिंन आणि रानकुत्रा या प्रजातींसाठी खंदक केले जाणार आहेत. तसेच नवीन सर्पोद्यानाची उभारणी तसेच नागरिकांसाठी आधुनिक सेवासुविधा वाढविण्याचे काम केले जाणार आहे.

सध्या प्राणिसंग्रहालयाचा वार्षिक खर्च महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असून पुढील काळात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच भारतातील इतर प्राणिसंग्रहालयांच्या तुलनेत पुण्यातील प्राणिसंग्रहालयाचे तिकीट शुल्क कमी असल्याने ते वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये स्थायी समितीने दरवाढीस मंजुरी दिली होती. त्यानंतर गेल्या सात वर्षांत तिकीट शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती.

प्राणिसंग्रहालायाचे सध्याचे शुल्क व प्रस्तावित शुल्क 

- प्रौढ (उंची ४ फूट ४ इंच व त्यापुढे) - सध्याचे शुल्क ४० रुपये, प्रस्तावित शुल्क ६० रुपये- लहान मुले (उंची ४ फूट ४ इंचापर्यंत) (०३ वर्षांखालील मोफत ) - सध्याचे शुल्क १० रुपये, प्रस्तावित शुल्क २० रुपये.- विदेशी नागरिक - सध्याचे शुल्क १०० रुपये, प्रस्तावित शुल्क १५० रुपये- अंध व अपंग - मोफत- विद्यार्थी (शैक्षणिक सहल शिक्षकांसह)

अ) खासगी शाळांमधील विद्यार्थी - सध्याचे शुल्क १० रुपये, प्रस्तावित शुल्क २० रुपयेब) महापालिका शाळा, जिल्हा परिषदा व शासकीय - सध्याचे शुल्क ०५ रुपये, प्रस्तावित शुल्क १० रुपये

- बॅटरी ऑपरेटेड वाहन सुविधा

अ ) प्रौढ (उंची ४ फूट ४ इंच व त्यापुढे) - सध्याचे शुल्क ४० रुपये, प्रस्तावित शुल्क ५० रुपयेब) लहान मुले (उंची ४ फूट ४ इंचांपर्यंत) - सध्याचे शुल्क २५ रुपये, प्रस्तावित शुल्क ३० रुपये- कॅमेरा वापर सुविधाअ) स्टील कॅमेरा - सध्याचे शुल्क ५० रुपये, प्रस्तावित शुल्क ५० रुपयेब) व्हिडीओ कॅमेरा - सध्याचे शुल्क २०० रुपये, प्रस्तावित शुल्क २०० रुपये

- गाईड (उपलब्धतेनुसार प्रत्येक समूह) - सध्याचे शुल्क ५० रुपये, प्रस्तावित शुल्क ५० रुपये

English
हिंदी सारांश
Web Title : Katraj Zoo Ticket Prices to Increase Citing Rising Expenses

Web Summary : Katraj Zoo's ticket prices are set to rise by 50% due to increasing expenses. The expansion includes new species exhibits and upgraded facilities. Ticket prices haven't increased in seven years, prompting this change.
टॅग्स :Puneपुणेkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयAnimalप्राणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNatureनिसर्गenvironmentपर्यावरण