शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Pune News | कात्रज-कोंढवा रस्ता होणार २४ ऐवजी १० मीटर रुंदीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 14:27 IST

भूसंपदानाअभावी गेली सात वर्षे हा विषय पूर्णत: मार्गी लागलेला नाही....

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी टिळेकरनगर मार्गे येवलेवाडी येथील पानसरे नगरकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जागा ताब्यात येत नसल्याने, महापालिकेने या ठिकाणी २४ ऐवजी १० मीटरचाच रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. विकास आराखड्यात या रस्त्याची लांबी तीन किमीची असून, त्याची रुंदी २४ मीटर ठेवली आहे; परंतु भूसंपदानाअभावी गेली सात वर्षे हा विषय पूर्णत: मार्गी लागलेला नाही.

महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांच्या विविध कामासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत भूसंंपादन होत नसलेल्या ठिकाणी, २४ ऐवजी १० मीटर रुंदीचाच रस्ता करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.

येवलेवाडीच्या विकास आराखड्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळून टिळेकरनगर मार्गे येवलेवाडीतील पानसरेनगरकडे जाणारा सुमारे तीन किमीचा २४ मीटर रुंदीचा रस्ता आखण्यात आला आहे. विशेष असे की हा विकास आराखडा भाजपच्या महापालिकेच्या सत्ताकाळात केला आहे. महापालिकेने विकास आराखडा मंजूर केला असला तरी, शासनाने अद्याप त्याला अंतिम मान्यता दिलेली नाही. २४ मीटर रुंदीच्या या तीन किमी रस्त्याच्या कामासाठी ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे.

नियोजित रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे नियोजन आहे. काही ठिकाणी इमारतींची कामेही झाली आहेत. बांधकाम व्यावसायिक परवानगी घेताना एफएसआय अथवा टीडीआरच्या बदल्यात जागा सोडतील. मात्र, काही नागरिकांचे छोट्या आकाराचे प्लॉट असून, काही ठिकाणी शेतजमीन आहे. त्यामुळे हे काम मार्गी लागावे, याकरिता १० मीटर रस्त्याचा पर्याय पुढे आला.

२८० काेटी रुपये खर्च अपेक्षितकात्रज-काेंढवा रस्त्याच्या भूसंपादन व विकासकामासाठी राज्य सरकारकडे २०० काेटी रुपये मागणीचा प्रस्ताव स्थायी समितीसमाेर मांडण्यात येणार आहे. भूसंपादन न झाल्याने या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून, आता हा रस्ता ८४ ऐवजी ५० मीटर रुंदीचाच करण्याचा निर्णय यापूर्वी महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामाला २८० काेटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यामध्ये २०० काेटी रुपयांचा वाटा राज्य सरकारने उचलावा, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkondhvaकोंढवाkatrajकात्रज