शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या गावचे अजितदादांकडे; कालवा अस्तरीकरण रोखण्यासाठी गाठले थेट ‘देवगिरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 17:18 IST

भेटीनंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन काम थांबवले असल्याचे शेकतकऱ्यांनी सांगितले

काटेवाडी : निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम सुरु झाल्याने काटेवाडीचे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.सुरु झालेले काम पहिल्याच दिवशी शेतकºयांनी बंद पाडले.आता हे काम कायम बंद करण्यासाठी  शेतकऱ्यांनी थेट  मुंबईतील अजित पवारांचे देवगिरी निवास्सथान गाठले.सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या बाबत चर्चा केली. 

मागील दोन दिवसांपूर्वी निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम सुरू असल्याचे माहिती मिळताच काटेवाडीतील शेतकऱ्यांनी मोठा विरोध करून काम बंद पाडले. निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण होऊ द्यायचे नाही वेळप्रसंगी मोठा लढा देण्याचीही तयारी केली आहे. अस्तरीकरणामुळे पाझर बंद होऊन कुंपणलिका विहिरीच्या पाणी पातळीवर परिणाम होऊन मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे अस्तरीकरण रोखण्यासाठी काटेवाडीतील शेतकरी एकवटला आहे त्यांनी थेट देवगिरी बंगला गाठला. उपमुख्यमंत्री पवार यांची सोमवार ( दि१७ ) रोजी सकाळी सात वाजता काटेवाडीतील शेतकऱ्यांनी भेट घेऊन याबाबत चर्चा केली.

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांनी सर्व परिस्थिती सांगितली. त्यावर पवार यांनी सुरुवातीला समजूत घालण्याचा प्रयत्न केला. बाबांनो हे काम पाठीमागेच भाजप सरकारच्या काळात सुरू झाले आहे. आपल्या काळात हे काम सुरु न झाल्याचे स्पष्ट केले.  मात्र अस्तरीकरणामुळे खरोखरच पाझर बंद होणार आहे, पाणी पातळी घटणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिथे विरोध आहे तेथील काम थांबविण्याची सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेदरम्यान केल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांना भेटलेल्या काटेवाडीतील शेतकºयांनी ‘लोकमत ’शी बोलताना सांगितली. या चर्चेदरम्यान पाटबंधारे खात्याचे  वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी अर्धा तासाहून अधिक वेळ गाववाल्यांशी  चर्चा करून माहिती जाणून घेतली.त्यानंतर सर्वांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेत या अस्तरीकरणाची माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीPoliticsराजकारण