शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कसब्यात महाविकास आघाडी; आता पुणेकर नवा खासदार म्हणून कोणत्या पक्षाला संधी देणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 14:38 IST

गिरीश बापट यांच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पुणे लाेकसभा पाेटनिवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली असून, ती अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीसाठी बंगळुरूहून पुण्याला ४,२०० मतदान यंत्रेही दाखल झाली आहेत.

या मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील मतदारांची यादी, मतदान यंत्रे, मतदानासाठी आवश्यक साहित्य याबाबत नियोजन करण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडे मतदान साहित्याबाबतची माहिती तातडीने मागवली आहे.

असे आहे नियाेजन 

- एकूण मतदार : १९ लाख ७२ हजार ३७२- मतदान केंद्रे : दोन हजार- बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशी १२,६०० यंत्रे जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध.- बंगळुरूहून ४,२०० मतदान यंत्रे प्राप्त झाली असून त्यांची प्राथमिक तपासणी सुरू- वापरण्यायोग्य यंत्रे, अतिरिक्त आणि पर्यायी यंत्रे, सुरक्षा व्यवस्था कोरेगाव पार्कमधील भारतीय खाद्य गोदामात.- उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या देखरेखीखाली तपासणी सुरू.

''केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान साहित्याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार माहिती संकलित करण्यात येत आहे. अद्याप पोटनिवडणुकीबाबत कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. परंतु, ४,२०० मतदार यंत्रे प्राप्त झाली आहेत. - भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी'' 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीश बापटPoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी