शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याबाबत पोलीस मांडणार राज्य सरकारकडे भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 11:17 IST

कार्तिकी यात्रेसाठी आळंदी येथे महाराष्ट्रातून पायी दिंड्या येतात. नऊ ते १० लाख भाविक व वारकरी आळंदीत दाखल होतात.

ठळक मुद्देआळंदी येथे कार्तिकी वद्य अष्टमी ते कार्तिकी अमावस्या दरम्यान कार्तिकी यात्रेचे दरवर्षी आयोजन

पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर धार्मिकस्थळे बंद आहेत. आळंदी येथे कार्तिकी वारी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा डिसेंबरमध्ये होणार आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. राज्य सरकारकडे प्रशासनाकडून भूमिका मांडण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी यावेळी दिले.

चिंचवड येथे पोलीस आयुक्तालयात सोमवारी बैठक झाली. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ एकचे उपायुक्त मंचक इप्पर, चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डाॅ. अभय टिळक, विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील, आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चाैधर, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे आदी या वेळी उपस्थित होते.   आळंदी येथे कार्तिकी वद्य अष्टमी ते कार्तिकी अमावस्या दरम्यान कार्तिकी यात्रेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा ८ ते १४ डिसेंबर दरम्यान हा सोहळा होणार आहे. यात हैबतराव बाबा यांच्या पायरीचे पूजन अष्टमीला झाल्यानंतर यात्रेला सुरवात होते. त्यानंतर ११ डिसेंबरला एकादशी तर १३ डिसेंबरला संजीवन समाधी दिन आहे. तर १४ डिसेंबरला यात्रेची समाप्ती होणार आहे. समाप्तीनिमित्त छबीना काढण्यात येतो.

कार्तिकी यात्रेसाठी आळंदी येथे महाराष्ट्रातून पायी दिंड्या येतात. नऊ ते १० लाख भाविक व वारकरी आळंदीत दाखल होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा होणार नसल्यास भाविक व वारकरी यांना सूचना देणे आवश्यक आहे. त्यामुळे या सोहळ्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे देवस्थानच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात आले.

राज्य सरकारकडे सोहळ्याबाबत भूमिका मांडण्यात येईल. त्यांच्याकडून नियमावली तसेच सूचना प्राप्त होतील त्यानुसार लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी या वेळी सांंगितले.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरAlandiआळंदीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार